Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सवाचा सण. भगवान विष्णूने भगवान श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतल्याने हिंदूंमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. द्वापार युगातील (Dwapar Yug) मथुरा नगरीमध्ये (Mathura) पाच हजार वर्षांपूर्वी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. कृष्ण जन्माष्टमी हा एक लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित सण आहे आणि संपूर्ण भारतभर गोकुळाष्टमी, सातम आथम, श्री कृष्णाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि अष्टमी रोहिणी अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. यानिमित्ताने मंदिरं सजवली जातात. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करण्यासाठी भजन कीर्तन केले जातात, घंटा वाजवली जातात, शंखनाद केला जातो आणि संस्कृत स्तोत्रे गायली जातात. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत यावेळी विशेष आध्यात्मिक मेळावे आयोजित केले जातात. संपूर्ण भारतातून यात्रेकरू या उत्सवात सहभागी होतात. परंतु कृष्ण जन्माष्टमी अनेकदा 2 दिवस साजरी केली जाते, एक दिवस स्मार्त आणि दुसरा वैष्णव. स्मार्त आणि वैष्णवांची जन्माष्टमी वेगवेगळ्या दिवशी का येते याबद्दल जाणून घेऊया.
मुळात जन्माष्टमी पंथानुसार सलग दोन दिवस येतात. वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय हे दोन वेगवेगळे कृष्ण पंथ आहेत. जेव्हा जन्माष्टमी तिथी सामान्य असते तेव्हा वैष्णव संप्रदाय आणि स्मार्त संप्रदाय दोन्ही समान तिथी पाळतात आणि एकाच दिवशी साजरी करतात. पण जर तारखा वेगळ्या असतील तर स्मार्त पंथ पहिल्या तारखेला आणि वैष्णव पंथ नंतरच्या तारखेला जन्माष्टमी साजरी करतात.
अष्टमी तिथी रात्री 09:20 पासून सुरू होते (18 ऑगस्ट)
अष्टमी तिथी रात्री 10:59 वाजता संपेल (19 ऑगस्ट)
निशीथ (रात्री) पुजेच्या वेळा (18 ऑगस्ट) रात्री 11:59 ते दुपारी 12:42 पर्यंत.
परान वेळ 19 ऑगस्ट रोजी रात्री 10:58 नंतर.
9 ऑगस्ट रोजी सकाळी 05:45 नंतरही करता येईल. यावर्षी वैष्णव कृष्ण जन्माष्टमी 19 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. 19 रोजी उपवास करणाऱ्यांसाठी निशिता पूजनाची वेळ रात्री 11:59 ते 12:43 अशी असेल आणि पारणाची वेळ 20 ऑगस्ट रोजी पहाटे 05:45 नंतर असेल. यंदा दहीहंडी 20 ऑगस्टलाच साजरी केली जाणार आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)