मुंबई, शास्त्रात कुबेर देवाला (Kuber) संपत्तीचा देव मानण्यात आला आहे. त्याच वेळी, त्यांना भगवान शिवाचा परम भक्त आणि नऊ खजिन्यांचा देवता देखील म्हटले गेले आहे. पौराणिक कथेनुसार कुबेर महाराज हे कायम संपत्तीचे स्वामी मानले जातात. पैसा स्थिर ठेवण्याचे काम देव कुबेर करतात आणि देवी लक्ष्मी पैशाची चलती ठेवते. म्हणूनच जो व्यक्ती भगवान कुबेराची पूजा करतो, त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याच वेळी, तो सर्व भौतिक सुखांचा आनंद घेतो. त्यामुळे जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असाल आणि खूप प्रयत्न करूनही पैसे वाचवू शकत नसाल तर बुधवारी कुबेर यंत्राची (Kuber Yantra) प्रतिष्ठापना करावी आणि दररोज कुबेर चालिसाचा (Kuber Chalisa) पाठ करावा. असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारण्यास सुरुवात होईल.
बुधवारी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरातील पूजास्थानी कुबेर यंत्राची स्थापना करा. सर्वप्रथम गंगाजल आणि कच्च्या गाईच्या दुधाने यंत्र स्वच्छ करा. यानंतर यंत्रासमोर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावा. यानंतर कुबेर चालिसाचे पठण करावे. त्याचबरोबर रोज आंघोळ केल्यावर चालिसा पाठ करावा लागतो.
रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी. पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्री महालक्ष्मयै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. मंत्र जप करणे शक्य नसल्यास 108 वेळेस ऐकावा. हा उपाय पती-पत्नीने एकत्र केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. मंत्र जप करण्यासाठी कमळगट्टाची माळ वापरावी. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.
घर बांधताना प्लॉटच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनवलेल्या नाग-नागिणीची जोडी पुरून टाकावी. घर बांधून झालेले असल्यास या दिशेला नाग-नागिणीची जोडी एका कलशात लपवून ठेवा. या उपायाने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते.
स्नान केल्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन महालक्ष्मीच्या – ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्म्यै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. या मंत्राने मोठमोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)