मुंबई : हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला लक्ष्मी पंचमी (Lakshmi Panchami 2021) साजरी केली जाते. या दिवशी भाविक देवी लक्ष्मीची उपासना करतात. लक्ष्मी पंचमीला श्री पंचमी आणि श्री व्रताच्या नावानेही ओळखलं जातं. आज नवरात्रीच्या पांचव्या दिवशी लक्ष्मी पंचमी आहे, त्यामुळे आजच्या दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून गेऊ देवी लक्ष्मीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व (Lakshmi Panchami 2021 Shubh Muhurat Puja Vidhi And Importance).
लक्ष्मी पंचमीचा प्रारंभ – 16 एप्रिल 2021 ला सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांपासून ते 17 एप्रिल 2021 ला सायंकाळी 8 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल.
1. या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि व्रताचा संकल्प करा.
2. यानंतर देवी लक्ष्मीचा पंचामृताने अभिषेक करावा आणि चंदन, ताळ, फुल, माळा, दूर्वा, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करा.
3. माता लक्ष्मी को कमल का फूल बहुत पसंद है. उन्हें कमल का फूल अर्पित करें.
4. त्यानंतर घरात श्री सूतकचा पठन करा. प्रसादात खीरचा नैवेद्य द्या.
5. यानंतर ब्राह्मणांना जेवू घाला आणि सामर्थ्यानुसार दान-दक्षिणा द्या.
मान्यतेनुसार, शुक्ल पंचमीला कल्पादी तिथी म्हटलं जातं. आजपासून कल्प तिथीला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार वर्षभर सात कल्प तिथी येते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी पूजा-अर्चना केल्याने घरात सुख-समृद्धी रहाते. त्याशिवाय, या दिवशी देवी लक्ष्मीची आरती, चलीसा पठन आणि मंत्रांचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमची मनोकामना पूर्ण होते.
पौराणिक कथेनुसार, एकदा देवी लक्ष्मी देवतांवर नाराज झाल्या. त्यानंतर सर्व देवता विहीन झाले. भगवान इंद्र देवाने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कठीण तपस्या केली. त्याशिवाय, इतर देवतांनीही देवी लक्ष्मीचीही उपासना आणि व्रत केला. यानंतर देवी लक्ष्मी परतल्या, या दिवशी चैत्र महिन्याची शुक्ल पक्षाची पंचमी तिथी होती. त्यामुळे हा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरी केली जाते.
Chaitra Navratri 2021 : देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, घरात सुख-समृद्धी नांदेल….https://t.co/88Z5x9k67T#ChaitraNavratri2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2021
Lakshmi Panchami 2021 Shubh Muhurat Puja Vidhi And Importance
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाताची पूजा विधी, आरती आणि महत्त्व…