Chandra Grahan 2024 : या वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण सप्टेंबर महिन्यात, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Sep 03, 2024 | 10:24 PM

चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी भारतात त्याला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आहे. त्यामुळे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण त्याचे नियम धार्मिक विधी मानणारे लोकं पाळतात. यावर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. जाणून घ्या चंद्रग्रहणाबाबत

Chandra Grahan 2024 : या वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण सप्टेंबर महिन्यात, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

अवकाशात ग्रह ताऱ्यांशी निगडीत अनेक घडामोडी घडत असतात. या ग्रह ताऱ्यांचा खगोलीय अभ्यास केला जातो. काही ठरावीक कालावधीनंतर अवकाशात या घडामोडी घडत असतात. त्यामुळे काही योग शेकडो वर्षांनंतर कधीतरी जुळून येतात. या घडामोडींना जसं खगोलीय महत्त्व तसंच ज्योतिष आणि धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात ग्रहणाबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत. त्यामुळे ग्रहण जवळ आलं की त्या नियमांची चर्चा होत असते. सप्टेंबर महिन्यात चंद्र ग्रहण लागणार आहे. या वर्षातील दुसरं आणि शेवटचं ग्रहण असणार आहे. यापूर्वी चंद्रग्रहण 25 मार्चला लागलं होतं. या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण 18 सप्टेंबरला लागणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 6 वाजून 12 मिनिटांपासून सुरु होईल आणि 10 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील. चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका, हिंद महासागर, अफ्रिका, आर्कटिक यूरोप, अटलांटिक महासागर आणि अंटार्कटिका या भागात दिसेल.. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतककाळही पाळण्याची गरज नाही.

या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण राशीचक्रानुसार 12 व्या राशीत म्हणजेच मीन राशीत असणार आहे. यामुळे राशीचक्रावर काही परिणाम दिसून येतील. खासकरून मीन, धनु, मेष आणि कन्या राशीच्या जातकांवर प्रभाव पडेल. त्यामुळे या कालावधीत नामस्मरणावर जोर देणं योग्य ठरेल. कौटुंबिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिअर आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. चंद्रग्रहण संपल्यानंतर दोन आठवडे मानसिक स्थितीत चलबिचल दिसेल. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न कारा.

या कालावधीत आर्थिक स्थिती खालावू शकते. त्यामुळे व्यवहार किंवा पैसा खर्च करताना काळजी घ्या. पैशांचं योग्य नियोजन करा आणि त्यानुसार खर्च करा. आपल्या अवास्तव पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. खासकरून या कालावधीत कोणाला पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका. मानापमानाच्या घडामोडी घडतील. पण संयम ठेवणं उचित ठरेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)