स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभात साध्वी बनणार; करणार दोन आठवड्यांची कठीण तपश्चर्या

| Updated on: Jan 15, 2025 | 7:12 PM

स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स साध्वी बनून महाकुंभात तपश्चर्या करणार आहेत. त्यांना कल्पवासाचाही अनुभव घ्यायचा आहे. कल्पवास करणे सोपे नसते. पण त्यांना सनातन धर्म समजून घ्यायचा आहे. तसेच त्यांना भारताची संस्कृती फार भावते त्यामुळे त्यांना या पवित्र महाकुंभाचा अनुभव घ्यायचा आहे.

स्टीव जॉब्सची पत्नी महाकुंभात साध्वी बनणार; करणार दोन आठवड्यांची कठीण तपश्चर्या
Follow us on

13 जानेवारी म्हणजे सोमवारी महाकुंभला सुरुवात झाली. तिथले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभाला भेट दिली आहे.

लॉरेन पॉवेल जॉब्स साध्वी बनून तप करणार

त्यात अजून एक मोठं नाव समोर आलं आहे ते म्हणजे स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स. लॉरेन यांनी महाकुंभाला भेट दिली आहे. एवढच नाही तर त्या दोन आठवडे प्रयागराज महाकुंभात साध्वी बनून तप करणार आहे.

महाकुंभ मेळाव्यात 61 वर्षीय लॉरेन पॉवेल यांच्या निवासाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. त्या महाराजा डिलक्स कॉटेजमध्ये रहाणार आहेत. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात 29 जानेवारीपर्यंत रहाणार आहेत.

सनातन धर्म सजण्याचा प्रयत्न करणार

तसेच सनातन धर्म सजण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. याशिवाय 19 जानेवारी सुरु होणाऱ्या कथेच्या त्या पहिल्या सन्मानीय यजमान असणार आहेत. लॉरेन पॉवेल प्रयागराज महाकुंभात निरंजनी आखाड्यात त्या कल्पवास करणार आहेत. कल्पवास म्हणजे काय? आणि महत्त्व काय जाणून घेऊयात

पॉवेल साध्वी बनून कल्पवास करणार

पॉवेल साध्वी बनून या पवित्र महाकुंभात दोन आठवडे ध्यान धारणा करणार आहेत. कल्पवासमध्ये ती वेळ घालवणार आहे. कल्पवास ही फार जुनी हिंदू परंपरा आहे, जी महाकुंभासारख्या महामेळ्यात अधिक महत्त्वाची ठरते. वेद आणि पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे.

पॉवेल निरंजनी आखाड्यातील महामंडलेश्वर स्वामी कैलासानंद यांच्या शिबिरात मुक्काम करणार आहेत. त्यांनी विविध विधींमध्ये भाग घेणे आणि संगमावर पवित्र स्नान त्या करणार आहेत जेणेकरून त्यांना महाकुंभाचे आध्यात्मिक सार पूर्णपणे आत्मसात करता येईल.

कल्पवास म्हणजे काय?

कल्पवास केल्याने आपल्या इच्छेचे फळ आपल्याला मिळते, असे म्हटले जाते. यामुळे जन्मानंतरच्या बंधनातून मुक्ती मिळते. संगमावरील संपूर्ण माघ महिन्यातील साधनेला कल्पवास म्हणतात. शास्त्रानुसार कल्पवासचा कमीत कमी कालावधी एक रात्र असू शकतो. बरेच लोक तीन रात्री, तीन महिने, सहा महिने, 12 वर्षे आणि आयुष्यभर कल्पवास करतात.

कल्पवासाचे नियम ?

कल्पवास करणे सोपी गोष्ट नाही. कल्पवासाच्या काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते – ज्यात सत्य बोलणे, अहिंसा, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा दाखवणे, ब्रह्मचर्य पाळणे, सर्व व्यसनांचा त्याग करणे, ब्रह्म मुहूर्तात उठणे, पवित्र नदीत दररोज तीन वेळा स्नान करणे, पितरांचे पिंडदान, दान, नामजप, विचारक्षेत्राबाहेर न येणे, कोणाचीही निंदा न करणे, साधूंची सेवा करणे, एक वेळच जेवण करणे, जमिनीवर झोपणे, देवाची आराधना करणे असे नियम पाळावे लागतात. पॉवेल साध्वी बनून कल्पवास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

पाप धुतले जातात आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात

दर बारा वर्षांनी होणारा महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. जगभरातून लाखो भाविक, संत आणि साधक येथे भेट देतात. संगमाच्या पाण्यात डुबकी मारल्याने पाप धुतले जातात आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. यंदाही दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक महाकुंभाला भेट देत आहेत.

पौराणिक मान्यतेनुसार देव आणि असुर यांच्यात समुद्रमंथन झाले होते. मंथनादरम्यान विष आणि अमृतही बाहेर पडले. असे मानले जाते की अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार भागांवर पडले.

यानंतर ही ठिकाणे पवित्र झाली. या ठिकाणी दर 12 वर्षांनी महाकुंभाचे आयोजन केले जाते. ही चार ठिकाणी म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक.