Rath yatra 2023 : पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला खूप महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्लपक्ष द्वितीय तिथीला ही रथयात्रा काढली जाते. रथयात्रेचा हा पर्व देशातील विविध शहरात साजरा केला जातो. परंतु, सर्वात मोठी यात्रा ही सप्तपुरींपैकी एक जगन्नाथ पुरी येथे दिसते. या यात्रेस सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील लोकं येतात. भगवान जगन्नाथ आणि देवी सुभद्रा यांचे दर्शन करतात. पुरीमध्ये यंदा महापर्व केव्हा साजरा केला जाणार आहे. येथे लोकं सहभागी का होतात, हे जाणून घेऊया.
भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव यंदा पुरीमध्ये २० जून २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्लपक्ष द्वितीया १९ जून २०२३ ला सकाळी ११.२५ वाजता सुरुवात होईल. २० जून २०२३ दुपारी १.०७ वाजतापर्यंत राहील. तिथीनुसार रथयात्रेचा महोत्सव २० जूनला साजरा केला जाईल.
हिंदू धर्मातील पुरी नगरीला पवित्र मानले जाते. कारण येथे चारही धामचे भगवान जगन्नाथ यांचे मंदिर आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण जगन्नाथाची मूर्ती आहे. भगवान जगन्नाथ यांच्यासोबत त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रासह अन्य देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. हिंदू मान्यतेनुसार, रथयात्रेत सहभागी होण्यासाठी भगवान जगन्नाथ आपल्या भक्तांवर कृपा करतात. रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा प्रसिद्ध गुंडिचा माता मंदिरात जातात.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाची बहीण आणि भाऊ बलराम यांनी नगर भ्रमणाची इच्छा व्यक्त केली. जगन्नाथ त्यांची मावशी गुंडिचा यांच्या घरी जाऊन सात दिवस आराम करत होते. तेव्हापासून ही प्रथा कायम असल्याचं सांगितलं जातं. दरवर्षी निघणाऱ्या यात्रेत सर्वात समोर बलराम राहतात. त्यांच्या पाठीमागे त्यांची बहीण सुभद्रा राहते. रथयात्रेत भगवान जगन्नाथ सर्वात शेवटी राहतात.
(टीप – दिलेली माहिती धार्मिक आस्था आणि लोकमान्यतेवर आधारित आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सामान्य लोकांची आवड लक्षात घेऊन माहिती दिली आहे.)