मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan Live) आज रात्री होणार आहे. हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणार आहे. ते 1:05 वाजता सुरू होईल, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी 9 तास आधी म्हणजेच आज दुपारी 04:05 पासून सुरू होईल. हे आंशिक चंद्रग्रहण असेल. वास्तविक, जेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर पडते तेव्हा त्याला खंडग्रास म्हणजेच आंशिक चंद्रग्रहण म्हणतात. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. हे ग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात होणार आहे. हे ग्रहण जर तुम्हाला ऑनलाईल पाहायचे असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
चंद्रग्रहणाचा ऑनलाईल आनंद घण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करावी लागेल. तुम्ही नासाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर जाऊन तेथे चंद्रग्रहणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. यासाठी तुम्ही https://www.youtube.com/@NASA या लिंकवर क्लिक करू शकता.
याशिवाय Timeanddate.com च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही चंद्रग्रहण लाईव्ह पाहू शकता.
या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याशिवाय उत्तर आणि दक्षिण-पूर्व अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, अंटार्क्टिका येथेही ते दिसणार आहे.
आज चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी आहे. हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे. कोजागिरी पौर्णिमा हा एक महत्त्वाच्या सणांपैकी आहे. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आटवले जाते. यंदा ग्रहण असल्याने अनेक जण उद्या रविवारी कोजागिरी साजरी करणार आहे. कोजागिरी पौरणिमेच्या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी लक्ष्मीचा पृथ्वीवर वास असतो. या दिवशी लक्ष्मीची पुजा करण्याला विशेष महत्त्व आहे. अनेक जणांच्या घरी भुलाबाईच्या गाण्याचा कार्यक्रमही आयोजीत केला जातो.
शरद पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रत करण्याचा संकल्प करावा. सर्व देवी-देवतांचे आवाहन करून वस्त्र, अक्षत, आसन, फुले, धूप, दीप, नैवेद्य, सुपारी, दक्षिणा इत्यादी अर्पण करून पूजा करावी. संध्याकाळी तूप मिसळलेली दुधाची खीर मध्यरात्री देवाला अर्पण करावी. रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्र देवाची पूजा करून खीरचा नेवैद्य दाखवावा. रात्री खीरने भरलेले भांडे चंद्राच्या अमृतप्रकाशात ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रसाद स्वरूपात सर्वांना वाटावे. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान कार्तिकेय यांची पूजा करावी.