मुंबई : आज रात्री वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse Today) होणार आहे. हे आंशीक चंद्रग्रहण असणार आहे, म्हणजेच चंद्राचा काही भागचं हा पृथ्वीच्या छायेखाली असेल. हे ग्रहण काही कारणांमुळे विशेष ठरतेय. त्यापैकी एक म्हणजे आज शरद पौर्णिमेच्या दिवशी हे ग्रहण होणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे ते भारतातून पाहाता येणे शक्य आहे. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. खगोलप्रेमींना याचे विशेष आकर्षण असते. हे ग्रहण आपल्याकडे दिसत असल्याने आज अनेकांनी ते पाहाण्याचा बेत आखला असेल. तुम्हालासुद्धा आजचं ग्रहण पाहायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा चंद्रग्रहण पाहाण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होऊ शकतो.
ग्रहण ही खगोलीय घटना आहे ते पाहिल्याने कुठलाही अपाय होत नाही, मात्र ते पाहाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
ग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ते पाहाण्यासाठी गॉगलचा वापर करावा.
ग्रहणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी हे आंशीक ग्रहण असणार आहे. हे ग्रहण कसे असते या बद्दल आधीच माहिती करून घ्यावी जेणे करून इतरांना तुम्ही त्याबद्दल सांगू शकाल.
ग्रहण पाहायला जाताना उबदार कपडे घाला, कारण आज शरद पौर्णिमा आहे. अनेक ठिकाणी थंडी पडायला सुरूवात झाली आहे. रात्री थंडीत बाहेर राहिल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
ही दुर्मिळ खगोलीय घटना पाहाण्याचा तुम्ही बेत आखला असेल तर, कदाचीत तुम्हाला ग्रहणाची पुर्ण स्थिती पाहाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे शक्यतो जेवण करूनच गच्चीवर या. तसेच सोबत पाण्याची सोय ठेवा.
तुम्हाला जर ग्रहणाचे क्षण कॅमेरात टिपायचे असेल तर आधी तुमचा कॅमेरा किंवा स्मार्टफोन पुरेसा चार्ज करा. यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फोटो काढणे शक्य होईल.
फोटो काढण्याआधी तुमच्या कॅमेराची लेंन्स स्वच्छ करा. यामुळे ग्रहणाच्या फोटोची क्लियारिटी चांगली मिळेल. हे फोटो तुम्ही नंतर सोशल मीडीयावर शेअर करू शकता. तुमच्या फोटोचा दर्जा जर उत्तम असेल तर तुम्ही ते वेबसाईटवर विकूही शकता.