मुंबई : हिंदू (Hindu)धर्मशास्त्रात पौर्णिमेच्या (Magh Purnima 2022) दिवसाला विशेष महत्त्व आहे. शुक्ल पक्ष महिन्याच्या शेवटच्या तारखेला माघ पौर्णिमा तिथी येते. या दिवशी चंद्र आपल्या संपूर्ण कलेत असतो. पौर्णिमेच्या दिवशी दान व स्नानाला विशेष महत्त्व असते. या दिवशी काही लोक उपवास ठेवतात आणि चंद्रांला (Moon) अर्घ्य अर्पण करतात.माघ महिन्याच्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावेळी माघ पौर्णिमा बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 रोजी येणार आहे . या दिवशी भाविक विशेषत: प्रार्थना करतात. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी माघ पौर्णिमेलाही विशेष योगायोग होत आहे. यावेळी माघ पौर्णिमेच्या दिवशी आश्लेषा नक्षत्र आणि कर्क राशीचा योग होत आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेला धार्मिक महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि जप केल्याने सुख-सौभाग्य, धन-संतान आणि मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. येथे जाणून घ्या माघी पौर्णिमेशी संबंधित काही खास गोष्टी.
माघी पौर्णिमेचे महत्त्व
माघ महिन्यात देवता मानवाचे रूप धारण करून पृथ्वीवर राहतात आणि प्रयागमध्ये दान आणि स्नान करतात असे मानतात. पौर्णिमेच्या दिवशी देव शेवटचे स्नान, दान इत्यादी करतात आणि त्यानंतर ते आपल्या देवलोकात परततात. या कारणास्तव या संपूर्ण महिन्यातच दान, स्नान, भजन, कीर्तन आणि मंत्रोच्चार यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू गंगाजलात वास करतात असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने सुख, सौभाग्य, धन, संतती आणि मोक्ष प्राप्त होतो. प्रयागमध्ये कल्पवास केल्यानंतर त्रिवेणी स्नान करण्याचा शेवटचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा.
माघ पौर्णिमा शुभ मुहूर्त
माघ पौर्णिमा 15 फेब्रुवारी 2022, मंगळवारी रात्री 09:12 पासून सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी 2022, बुधवारी रात्री 10:09 पर्यंत चालेल.
या गोष्टी लक्षात ठेवा
माघ पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला प्रयागराजमध्ये स्नान करता येत नसेल तर तुम्ही गंगेच्या कोणत्याही तीरावर स्नान करू शकता. हे शक्य नसेल तर घरी गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नानानंतर सूर्य मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते . तुम्ही लक्ष्मीसह नारायणाची पूजा करा. या दिवशी सत्यनारायणाची कथा अवश्य वाचावी. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये केळीची पाने, पंचामृत, फुले, अक्षत, गंगाजल, पिवळे चंदन इत्यादींचा वापर करा.
या दिवशी आपल्या क्षमतेनुसार काहीही दान करा . तुम्ही गूळ, काळे तीळ, कापूस, अन्न, कपडे, तूप, लाडू, धान्य इत्यादी काहीही दान करू शकता.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी