मुंबई : कुंती आणि सूर्याचा मुलगा कर्ण हा महाभारतातील (Mahabharta Story) एक योद्धा मानला जातो. कर्णाचे (Karn) वडील पांडू होते, पण त्याचे पालक अधिरथ आणि राधा होते. कर्ण दाता म्हणून प्रसिद्ध होता, त्याने आपले कवचकुंडले दान केली. इतकेच काय तर शेवटच्या क्षणी त्याला सुवर्ण दान मागण्यात आले होते तर त्याने सोन्याचा दातही दान दिला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा उपदेश दिला होता की, दान करताना दानाचे विशेष फळं मिळेल अशी भावना मनात असेल तर दानाचे पुण्य प्राप्त होत नाही आणि दान निष्फळ होते.
भगवान श्रीकृष्णानेही कर्णाला सर्वात मोठा दाता मानले आहे. अर्जुनाला कर्णाची स्तुती आवडली नाही, म्हणूनच त्याने एकदा कृष्णाला विचारले की सर्वजण कर्णाची इतकी स्तुती का करतात? कृष्णाने दोन पर्वत सोन्यात बदलले आणि हे सोने गावकऱ्यांमध्ये वाटा असे अर्जुननाला आणि कर्णाला सांगीतले. त्यानंतर अर्जुनाने गावकऱ्यांना बोलावून पर्वत कापायला सुरुवात केली आणि काही वेळाने थकून खाली बसला. मग कृष्णाने कर्णाला बोलावून सोन्याचे वाटप करण्यास सांगितले, काहीही विचार न करता कर्णाने गावकऱ्यांना सांगितले की हे सर्व सोने गावकऱ्यांचे आहे आणि त्यांनी ते आपापसात वाटून घ्यावे. तेव्हा कृष्णाने स्पष्ट केले की दान करण्यापूर्वी कर्ण त्याच्या हिताचा विचार करत नाही. यामुळे त्यांना सर्वात मोठा दाता म्हटले जाते.
कवच कुंडले दान करताना त्याने आपल्या दातृत्वाची खरी ओळख करून दिली. कर्ण जेव्हा सूर्याची उपासना करत होता तेव्हा इंद्राने ब्रह्मणाचा वेश धारण करून कर्णाकडे त्याचे कवच आणि कुंडल मागितले. सूर्याने कर्णाला कवच आणि कुंडलं देण्यास मनाई केली होती, पण कर्णाने कोणाचीही निराशा केली नाही म्हणून त्याने आपले कवच आणि कुंडल दान केले. हे दान आपल्या मृत्यूचे कारण बनू शकते हे कर्णाला माहीत होते, तरीही त्याने स्वतःच्या हिताचा विचार न करता दान केले आणि आपल्यापेक्षा मोठा दाता कोणी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
कर्ण दानासाठी प्रसिद्ध होता. कर्ण रणांगणात शेवटचा श्वास घेत असताना भगवान श्रीकृष्णाला त्याच्या दानधर्माची परीक्षा घ्यायची होती. श्रीकृष्ण एका गरीब ब्राह्मणाच्या वेशात कर्णाकडे गेले आणि म्हणाले की मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि मला अजूनही तुझ्याकडून काही दान हवे आहे. कर्ण उत्तरात म्हणाला की तुम्हाला जे हवे ते मागू शकता. ब्राह्मणाने सोने मागितले. कर्ण म्हणाला की सोने त्याच्या दातांमध्ये आहे आणि तुम्ही ते घेऊ शकता. ब्राह्मणाने उत्तर दिले की तुझे दात तोडण्याइतका मी निच नाही. मग कर्णाने एक दगड उचलला आणि त्याचा सोन्याचा दात तोडला. ब्राह्मणाने तेही घेण्यास नकार देत म्हणाला की हे रक्ताने माखलेले सोने मी घेऊ शकत नाही. कर्णाने मग एक बाण उचलला आणि आकाशाच्या दिशेने सोडला. यानंतर पाऊस सुरू झाला आणि दात धुतल्या गेला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)