हिंदू धर्मामध्ये महाकुंभाला अत्यंत पवित्र स्थान देण्यात आले आहे. 2025 मध्ये महाकुंभ प्रयागराज येथे साजरा होत आहे. यंदाचा महाकुंभ आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचे कारण म्हणजे 2025 मधील महाकुंभ 144 वर्षांनंतर आला आहे. या महाकुंभामध्ये स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतात. या महाकुंभामध्ये एकुण चार शाही स्नान होणार होत्या ज्यामधील तील शाही स्नान पूर्ण झाले आहेत आणि आता चौथ्या शाही स्नानची जय्यत तयारी सुरु आहे. या दरम्यान, प्रयागराजनंतर आता काशीमध्ये देखील नगासाधूंचे गट एकत्र जमायला लागले आहेत. काशीच्या घाटांवर शैव पंथामधील नागांची गर्दी दिसू लागली आहे.
परंतु तुम्हाला माहिती आहा का? नागा साधूंच्या या गर्दीमध्ये हातामध्ये गदा घेऊन फिरणाकी नागा साध्वी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या नागा साध्वीचे नाव सरला पूरी असून त्यांचा संबंध जुन्या आखाड्याशी आहे. सरला पूरी त्यांच्या हातामध्ये रामभक्त हनुमाना सारखी हातात गदा घेऊन फिरताना दिसत आहे. सरला दिवसभर त्यांच्या खांड्यावर गदा घेऊन फिरताना दिसते. त्यांच्या हातामधील गदाचे वजन 11 किलो असल्याचे सांगितले जाते. एका मुलाखाती दरम्यान सरला पुरी यांनी सांगितले की, सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हातामध्ये गदा धरली आहे. पुरी यांच्या मते ही खास गदा आहे ज्यामुळे सनातन धर्माची बदनामी करणाऱ्या किंवा हानी पोहोचवणाऱ्यांना धर्मद्रोहींसाठी आहे.
महिला नागा साध्वी सरला पुरी यांनी वाराणसीतील हरिश्चंद्र घाटावर त्यांचे तंबू उभारला आहे. सरला म्हणाल्या की, ती महाराज बसंत पुरी यांची शिष्या आहे आणि मूळची महाराष्ट्राची आहे. सध्या, प्रयागराजमध्ये 1 महिना राहिल्यानंतर, सरला पुरी आता काशीलामध्ये आहे. त्यांची ही अनोखी शैली पाहण्यासाठी काशीच्या घाटांवर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. संत समितीचे राष्ट्रीय महासचिव स्वामी जितेंद्रानंद सरस्वती म्हणाले की, शैव पंथाचे पूजनीय देवता महादेव आहेत आणि काशी हे त्यांचे आवडते शहर आहे जिथे स्वतः बाबा विश्वनाथ राहतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या पूजेशिवाय, शैव पंथातील नागा साधूंसाठी महाकुंभाचे शाही स्नान अपूर्ण मानले जाते. म्हणूनच नागा साधू काशीमध्ये शेवटच्या महाशिवरात्रीचे अमृत स्नान करतात आणि नंतर ते हिमालय आणि उत्तराखंडकडे जातात आणि अदृश्य होतात.
महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी अनेक नागासाधू एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. धार्मिक मान्यतेनुसार यांदाचा महाकुंभामध्ये स्नान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होईल. त्यासोबतच तुमची महत्त्वाची कामे लवकर होतील. महाकुंभामध्ये स्नान करताना तुमच्या मनामध्ये चांगले विचार असणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि महादेवाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी महाकुंभामध्ये स्नान करावे. महाकुंभामध्ये जाताना स्वच्छ आणि सकारात्मक विचार करावा.