मुंबई : शिवरात्रीचा दिवस हा देवतांचे दैवत महादेवाला प्रसन्न करून पूजण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो . त्यामुळे शिवभक्त वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. या दिवसाला महा शिवरात्री (Maha Shivratri 2022) असेही म्हणतात . वास्तविक, दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव (Shiv) आणि माता (Parvati) पार्वतीचा विवाह संपन्न झाला असे म्हणतात . या आनंदात शिव आणि माता पार्वतीचे भक्त हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतात. यादरम्यान शिवभक्त त्यांना विविध प्रकारच्या वस्तू अर्पण करतात आणि भक्तीभावाने शिव-पार्वतीचा उपवासही ठेवतात. या दिवशी पूजेसाठी नियमांचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे. या दिवशी कोणतीही चूक करणे अशुभ असते आणि असे असूनही काही लोक चुका करतात.
संबंधीत बातम्या :
zodiac | आजपासून तुम्ही बोलाल ते आणि तसंच होणार, पंचग्रही योगामुळे या 5 राशींचे नशीब चमकणार
Maha Shivratri 2022 | महाशिवरात्रीनिमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात दूमदूमली मुक्ताई नगरी….