मुंबई, हिंदू धर्मात आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023) विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीची शिवभक्त मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात. यंदा महाशिवरात्री हा सण 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी साजरा होणार आहे. हा सण फाल्गुल महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने उपवास करून भगवान भोलेनाथाची पूजा करतात.
या दिवशी शिवभक्त भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भांग-धतुरा, दूध, चंदन, बेलपत्र अशा अनेक वस्तू अर्पण करतात. परंतु अनेकवेळा शिवभक्त जाणूनबुजून किंवा नकळत अशा गोष्टी अर्पण करतात ज्यामुळे भगवान शिव क्रोधित होतात. शास्त्रानुसार अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यांचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेमध्ये करू नये. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण करू नयेत.
शंखाने चढवू नये पाणी: महादेवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचे वध केले होते. शंखाला याच राक्षसाचे प्रतीक मानले आहे, जे विष्णूचे भक्त आहे. म्हणून विष्णूची पूजा शंखाने होते परंतू महादेवाची नाही.
तुळस: प्रभू विष्णूने तुळशीला पत्नी रूपात स्वीकार केले आहे म्हणून महादेवाला तुळस अर्पित केली जात नाही.
नारळ पाणी: नारळाचे पाणी देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे महादेवाला अर्पित केले जात नाही.
तांदळाचे तुकडे: अक्षता म्हणून अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे. तुटलेले तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नये.
हळद कुंकू: हळद- कुंकू सौभाग्याचे प्रतीक आहे जेव्हाकी महादेव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू चढवतं नाही.
हिंदू कॅलेंडरनुसार, 2023 मध्ये, कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारीख 18 फेब्रुवारी रोजी रात्री 8:02 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला 4:18 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीची पूजा निशिता काळात होत असल्याने हा सण 18 फेब्रुवारीलाच साजरा करणे योग्य ठरेल आणि कोईम्बतूर, तमिळनाडू येथे, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्थापन केलेल्या ईशा फाऊंडेशनमध्ये, प्रसिद्ध अखंड महाशिवरात्री कार्यक्रम 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि सकाळी 6 वाजेपर्यंत चालेल.