Mahashivratri 2024 : महादेवाला बेल का वाहतात? अनेकांसाठी नवीन आहे माहिती

| Updated on: Mar 06, 2024 | 11:04 AM

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे, संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही..

Mahashivratri 2024 : महादेवाला बेल का वाहतात? अनेकांसाठी नवीन आहे माहिती
शिवलिंग
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात, त्रिदेवांपैकी एक असलेले महादेव यांना देवादी देव म्हंटले जाते. त्यांचे दोन मुख्य सण वर्षाभरात साजरे केले जातात, एक महाशिवरात्री जो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल आणि दुसरा श्रावण महिना आहे. महाशिवरात्रीचा सण आता साजरा होणार असल्याने आपण महादेवाशी संबंधीत काही मान्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) महादेवाचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. या दिवशी सर्वत्र शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते. शिवालयात हर हर महादेवचा नाद घुमतो. हा सण उत्साहात साजरा केला जातो. सर्वजण शिवभक्तीत तल्लीन होतात. यासोबतच लोक या दिवशी पूजेदरम्यान भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण करतात. बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते. चला जाणून घेऊया बेलपत्र अर्पण केल्यावर लगेच महादेव का प्रसन्न होतात, त्यामागे एक पौराणिक कथा आहे जी आपण जाणून घेऊया.

महादेवाला बेलपत्र का अर्पण केले जाते?

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे, संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले. देव आणि दानवांनाही त्रास झाला. मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली. मग भगवान शिवाने ते हलहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले. विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवाचा कंठ निळा पडला.

त्यानंतर देवांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले. बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी होऊ लागले. तापमान कमी करण्यासाठी बेलपात्र खरोखर उपयुक्त आहे. देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवाची उष्णता कमी झाली आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की आतापासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करीन. तेव्हापासून भगवान शंकरावर किंवा त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा चालू आहे.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)