महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहे. भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पावर्तीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते, असं म्हटलं जातं. दर वर्षी फाल्गून महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शंकर आणि माता पावर्ती याचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिव-पार्वतीची पालखी काढण्यात येते.
महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते. तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो. तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदतं. या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरतं, हे जाणून घेऊयात. तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मूहर्ताबाबत जाणून घेऊयात.
पंचागानुसार, फाल्गुनमधील कृ्षण पक्षातील चतुर्दशी तिथीला 26 फेब्रुवारी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी सुरुवात होईल. तर चतुर्दशी समापन 27 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी होईल. तर महाशिवरात्रीचा व्रत 27 फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल. सकाळी 6 वाजून 59 मिनिटं ते सकाळी 8 वाजून 54 मिनिटं ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल.
दरम्यान महादेवाची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्राचा जप करावा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहेत. मात्र पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवा? हे आपण जाणून घेऊयात.
(Disclaimer: वरील माहिती धार्मिक आणि सामन्य माहितीवर आधारित आहे. याबाबत टीव्ही9 मराठी याबाबत पुष्टी करत नाही.)