महात्मा गांधी
Image Credit source: social Media
मुंबई : 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजींच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस त्यांच्या आदर्शांच्या स्मरणाचा दिवस आहे ज्यामुळे त्यांनी शस्त्र न उचलता इंग्रजांना भारतातून हाकलून दिले. त्यांचे विचार हे त्याची तलवार आणि ढाल दोन्ही होते. महात्मा गांधींची जीवनकथा, सत्याचा संदेश, अहिंसा आणि प्रेमाने देशातीलच नव्हे तर परदेशातही अनेकांना प्रेरणा दिली. शहीद दिन आपल्याला महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देतो. त्यांचे विचार आजही राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतात, म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही त्यांचे हे अनमोल विचार तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.
महात्मा गांधी यांचे अमुल्य विचार
- आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे. – महात्मा गांधी
- अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे. – महात्मा गांधी
- आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. –महात्मा गांधी
- इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. – महात्मा गांधी
- एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.– महात्मा गांधी
- तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.– महात्मा गांधी
- कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.– महात्मा गांधी
- कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.– महात्मा गांधी
- खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. – महात्मा गांधी
- चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. – महात्मा गांधी
- जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. – महात्मा गांधी
- ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. – महात्मा गांधी
- धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.– महात्मा गांधी
- प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.– महात्मा गांधी
- प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते.– महात्मा गांधी