मुंबई, 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीचा (Makar Sankrant 2023) सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, याला मकर संक्रांत म्हणतात. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होऊ लागतो म्हणजेच दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात. मकर संक्रांत हा दान, पुण्य आणि देवतांचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. मकर संक्रांतीला खिचडी (Khichadi) असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास विशेष फळ मिळते. असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्यानंतर जे सूर्यदेवाचे मंत्र आणि त्यांच्या 12 नावांचा जप करतात त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया सूर्यदेवाचे मंत्र आणि 12 नावे ज्यांचा जप करावा लागतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे. हे व्रत भगवान सूर्य नारायण यांना समर्पित आहे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी, गूळ आणि गुलाबाची पाने देवाला अर्पण करा. गूळ, तीळ आणि मूग डाळ यांची खिचडी खावी आणि ती गरिबांमध्ये वाटावी. या दिवशी गायत्री मंत्राचा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुम्ही भगवान सूर्य नारायणाच्या मंत्रांचाही जप करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)