मुंबई, मकर संक्रांत (Makar Sankranti) हा नविन वर्षातला पहिला मोठा सण आहे. प्रमुख सणांपैकी हा एक मानला जातो. मकर संक्रांत भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाते. हा सण गुजरातमध्ये उत्तरायण, पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी आणि दक्षिण भारतात पोंगल (Pongal) म्हणून साजरा केला जातो. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीत प्रवेश करणाऱ्या सूर्याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होत असली तरी 2023 मध्ये मकर संक्रांत नेमकी कधी येईल याबाबत काही शंका आहे. अशा परिस्थितीत येत्या वर्षात मकर संक्रांती कधी साजरी होणार हे जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.21 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला उदया तिथी येत आहे. त्यामुळे नवीन वर्षात 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे. नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून काळे तीळ, गुळाचा छोटा तुकडा आणि गंगेचे पाणी घेऊन सूर्यदेवाच्या मंत्रांचा उच्चार करताना अर्घ्य द्यावे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासोबतच शनिदेवाला जलही अर्पण करावे. यानंतर गरिबांना तीळ आणि खिचडी दान करा.
मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे. यामुळे सूर्याची कृपा होते आणि कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे केल्याने सूर्य आणि शनि या दोघांचाही आशीर्वाद मिळतो, कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)