मुंबई : मकर संक्रांती (Makar Sankranti 2024) हा वर्षाचा पहिला सण असतो. संक्रांत हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. तसेच या शुभ दिवशी जे काही दान केले जाते त्याचे फळ नक्कीच मिळते. मान्यतेनुसार गंगेत स्नान केल्यावर दानधर्म करणाऱ्या आणि पितरांना नैवेद्य दाखवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. आणि सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात.
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. कारण 15 जानेवारी रोजी रात्री 2:43 वाजता सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल.
14 जानेवारीच्या रात्री 2:44 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सोमवार, 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. शनि हा सूर्याचा पुत्र आहे. तो सूर्याला आपला शत्रू मानतो. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. दोन महिन्यात सूर्य आपला मुलगा शनीच्या घरी राहायला येतो. सूर्य 14 मार्च रोजी दुपारी 12:36 वाजता मीन राशीत प्रवेश करेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती म्हणतात. आणि हा सण त्याच दिवशी साजरा करण्याची धार्मिक मान्यता आहे. मकर संक्रांतीला दान, स्नान, पूजा आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)