Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तीळाचे हे उपाय करा, अडचणीतून मुक्ती मिळवा!

| Updated on: Jan 10, 2025 | 3:19 PM

मकर संक्रांतीला हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभही होत आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचं महत्त्व आणखी वाढलं आहे. या दिवशी स्नान आणि दानची परंपरा आहे. विशेष म्हणजे तीळाचे काही उपाय केल्यास अडचणीतून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊयात ज्योतिषीय उपाय

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तीळाचे हे उपाय करा, अडचणीतून मुक्ती मिळवा!
Follow us on

मकर संक्रांती म्हणजे सूर्य या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेशाचा दिवस.. या दिवसाला हिंदू धर्म शास्त्रात खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे यंदा प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा आहे. या मेळाव्यात मकर संक्रांतीचं खास असं आकर्षण आहे. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचं महत्त्व आहे. अनेक पिढ्यांपासून ही परंपरा चालत आली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास आणि दानधर्म केल्यास पुण्य फळ मिळतं. यंदाची मकरसंक्रांती 14 जानेवारीला आहे. सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी प्रवेश करतील. या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं. या दिवशी तीळाचं खास महत्त्व आहे. तीळाचे दोन प्रकार आहेत एक काळे आणि दुसरे पांढरे.. यापैकी काळ्या तीळाला अधिक महत्त्व आहे. या दिवशी काळ्या तीळाचे अनेक उपाय केले जातात. हिंदू धर्मशास्त्रानुसार, काळ्या तीळाचे उपाय केल्यास सूर्य आणि शनि या दोन्ही ग्रहांचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊयात काळ्या तीळाचे उपाय…

काळ्या तीळाचे उपाय

  • मकर संक्रांतीला काळ्या तीळाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे. काळ्या तीळाचे लाडू खाल्ल्याने घरात सुख समृद्धी राहते अशी ज्योतिषीय मान्यता आहे. तसेच आरोग्यही सदृढ राहतं.
  • आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्यास सर्व रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते.
  • या दिवशी स्नान केल्यावर सूर्याला अर्घ्य देताना त्यात काळे तीळ टाकावेत. असं केल्याने सूर्य देवांची विशेष कृपा राहते. तसेच करिअरमधील अडचणी दूर होतात.
  • या दिवशी खिचडी करण्याची एक प्रथा आहे. त्या खिचडीत काळे तीळ टाकल्यास सूर्य आणि शनिदेवांची कृपा राहते. आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळते.
  • या दिवशी काळ्या तीळाचा नैवेद्य दाखवणे, तीळ मिसळून अन्न खाणे आणि पाण्यात तीळ टाकल्याने विशेष लाभ मिळतो.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)