मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्याला सूर्याचा संक्रमण काळ म्हणतात. वर्षातील हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जोते. देशामधील अनेक भागांमध्ये मकर संक्रांती हा सण ‘खिचडी’ या नावाने साजरा केला जातो. पुरानांमध्ये, महाभारताच्या वेळी भीष्म पितामहांनी सूर्य उत्तरायणाच्या वेळी आपले देह त्यागले होते. त्यानंतर त्याचं दिवशी त्यांचे श्राद्ध आणि तर्पण विधी केले गेले होते. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे आणि दान करणे याचे विशेष महत्त्व मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला तांदूळ, काळी मसूर, हळद, वाटाणा आणि हिरव्या भाज्यांचे विशेष महत्त्व आहे. अनेत घरांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये तांदळाची खिचडी शिजवली जाते. यामुळे तुमच्या घरामधील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तांदळाची खीचडी तुमच्या कुंडलितील चंद्र आणि शुक्राला शांत करण्यास मदत करते. काळ्या मसूरमुळे शनि, राहू आणि केतू शांत होते. तुमच्या आयुष्यामध्ये गुरुची समस्या असेल तर हळदीचा जास्त प्रमाणात वापर करा. तुमच्या आयुष्यातील बुध मतबूत करण्यासाठी हिरव्या भांज्यांचा वापर करावा. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी केल्यामुळे तुमचे मंगळ आणि सूर्य मजबूत होण्यास मदत होते. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी घरामध्ये शिजवल्यामुळे तुमच्या कुंडलितील ग्रह सुधारण्यास मदत करते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी घरात शिजवून दान केल्यामुळे तुम्हाला अधिक पुण्याची प्राप्ती होते.
बाबा गोरखनाथांचा संबंध मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीशी आहे. मान्यतेनुसार, खिलजीच्या युद्धामध्ये बाबा गोरखनाथांच्या योगींना अन्न शिजवता येत नव्हते आणि दिवसांदिवस उपाशी राहिल्यामुळे त्यांना अशक्तपणा येत होता. योगींची बिघडलेली अवस्था पाहून बाबांनी अपल्या जवळील भातामध्ये डाळ आणि काही भाज्या मिसळून शिजवण्याचा सल्ला दिला. तांदळाचा हा पदार्थ कमी वेळामध्ये तयार झाला आणि याचे सेवन केल्यामुळे योगींचा अशक्तपणा दूर गेला आणि त्यांच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण झाली. बाबा गोरखनाथांनी डाळी, तांदूळ आणि भाज्यांपासून बनवलेल्या या अन्नाला खिचडी असे नाव दिले. आजही मकर संक्रांतीच्या दिवशी गोरखपूरमध्ये बाबा गोरखनाथ मंदिराजवळ खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्या परिसरात खिचडी दान देखील केली जाते.
उदयतिथीनुसार मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ८.४१ वाजता आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, मकर संक्रांती साजरी करण्यासाठी पुण्यकाळाची वेळ सकाळी 9.03 ते सायंकाळी 5.46 पर्यंत असेल आणि महापुण्यकाळाची वेळ संध्याकाळी 9.03 ते 10.48 पर्यंत असेल.