हनुमान
Image Credit source: Hanuman Jayanti
मुंबई : असे म्हटले जाते की मंगळवारी व्रत ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित (Mangalwar Upay) असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंगळवारी उपवास करतात. ज्योतिष शास्त्रात मंगळवारच्या व्रताबद्दल काही खास नियम सांगण्यात आले आहेत. धर्मग्रंथात दानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. दान केल्याने जिथे आसक्तीपासून मुक्ती मिळते, त्याच वेळी जीवनातील दोषही दूर होतात. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. अशा वेळी या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने जीवनातील संकटे दूर होतात.
मंगळवारी करा या वस्तूंचे दान
- तांदूळ आणि दलिया दान : या दानात तांदूळ आणि दलिया दान करतात. हे दान केल्याने रोगांचा नाश होतो आणि धनाची वृद्धी होते.
- दुधाचे दान : मंगळवारी दुधाचे दान करावे. हे दान आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- बेल दान: बेलच्या पानांचे दान केल्याने रोगांपासून संरक्षण होते आणि धनवृद्धी होते.
- देशी गाईचे तूप दान: देशी गाईचे तूप दान केल्याने निरोगी राहण्यास मदत होते आणि भविष्यात सुख आणि समृद्धी मिळते.
- चणे दान: भाजलेले चणे दान केल्याने व्यवसायात नफा होण्यास मदत होते आणि नशीब सुधारते.
- लाल तिखट दान : या दानात लाल तिखट दान केले जाते. हे दान शत्रूंपासून संरक्षण करते आणि संतप्त लोकांचे मन वळविण्यास मदत करते.
- तुळशीच्या रोपांचे दान : तुळशीच्या रोपांचे मंगळवारी दान केले जाते. हे दान जीवनात निरोगी राहण्यास मदत करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.
- कडधान्य : या दानामध्ये हरभरा, शेंगदाणे इत्यादी पौष्टिक अन्नधान्य दान केले जाते. या दानामुळे भुकेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
जर तुम्हाला मंगळवारी दान करायचे असेल तर तुम्ही यापैकी कोणतेही दान करू शकता. असे केल्याने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)