मंगळवारचे प्रभावी उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी पवनपुत्र हनुमानाची पूजा केली जाते. त्यांना बजरंगबली, केसरी नंदन, शंकर सुवन, पवनपुत्र इत्यादी नावांनी ओळखले जाते. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. यासोबतच घरात सुख-समृद्धी येते. त्याचबरोबर शनीची बाधाही दूर होते. तुम्हीही आर्थिक संकटाने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर मंगळवारी हे उपाय (Mangalwar Upay) अवश्य करा.
हे उपाय अवश्य करा
- जर तुम्ही आर्थिक संकटासह इतर समस्यांमधून जात असाल तर मंगळवारी हनुमान मंदिरात जा आणि त्यांच्या पायासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच त्यावर चमेलीचे तेल आणि शेंदूराचा लेप लावा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
- तुमचे काम होत नसेल किंवा अथक प्रयत्न करूनही काम बिघडत असेल तर मंगळवारी देवघरात हनुमान यंत्राची स्थापना करा. यानंतर विधिनुसार पूजा-अर्चा करावी. हनुमान यंत्राची पूजा केल्याने सर्व वाईट कर्मे दूर होतात असे म्हणतात.
- हनुमानजींना लाल रंग खूप प्रिय आहे. त्यामुळे मंगळवारी हनुमानजींना लाल रंगाच्या फुलांची माळ अर्पण करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हनुमानजींना लाल गुलाबही अर्पण करू शकता. यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात. हा उपाय केल्याने शनिदेवाच्या विघ्नांपासून मुक्ती मिळते.
- आर्थिक समस्यांपासून सुटका हवी असेल तर मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. त्याचबरोबर संध्याकाळी देशी तुपाचा दिवा लावावा. यानंतर बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचे पठण करा. हा उपाय केल्याने सर्व दु:खांचा नाश होतो.
- मंगळवारी हनुमानजींची सकाळी आणि सायंकाळी पूजा करणे फलदायी मानली जाते. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. या दिवशीय विधिपूर्वक हनुमानजींची पूजा केल्यास शुभ परिणाम मिलतात.
- भगवान हनुमानजी यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन ‘राम नाम’चा जप करावा. बजरंगबली यांना प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे ‘राम नाम’चा जप अवश्य करावा.
- मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात गुळ आणि हरभऱ्याच्या प्रसाद ठेवावा. असे केल्याने जीवात सुख-शांती आणि समृद्धी येते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)