मुंबई : दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील मासिक शिवरात्रीचे व्रत (Shivratri Vrat) आज, शुक्रवार, 16 जून 2023 रोजी पाळण्यात येणार आहे. मासिक शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि गौरी मातेची पूजा केल्याने त्यांचा अपार आशीर्वाद प्राप्त होतो. मासिक शिवरात्रीचे व्रत हे शत्रूंचा नाश करणारे, अखंड सौभाग्य देणारे आणि योग्य वर देणारे आहे. म्हणूनच लोकं मासिक शिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करतात, अभिषेक करतात आणि उपाय करतात.
मराठी दिनदर्शिकेनुसार, जेष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारीख 16 जून 2023 शुक्रवारी सकाळी 08.39 पासून सुरू होईल आणि 17 जून 2023 रोजी शनिवारी सकाळी 09.11 वाजता समाप्त होईल. प्रदोष काळात मासिक शिवरात्रीची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आषाढ मासिक शिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा असल्याने मासिक शिवरात्रीची तारीख 16 जून मानली जाईल. यासोबतच मासिक शिवरात्रीला धृती नावाचा शुभ योगही तयार होत आहे.
शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रत्येक कार्यात यश मिळविण्यासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी मासिक शिवरात्रीचा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी मासिक शिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान शिवाच्या ‘ओम शन शन शिवाय शन शन कुरु कुरु ओम’ या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या शत्रूंचा लवकरच पराभव होईल. यासोबतच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू लागेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)