Masik Shivratri February 2024 : उद्या मासिक शिवरात्री, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना

| Updated on: Feb 09, 2024 | 7:04 PM

दर महिन्यात येणाऱ्या शिवरात्री तिथीला मासिक शिवरात्री म्हणातात. महादेवाच्या उपासनेने सर्व समस्या चिंता दूर होतात. मासिक शिवरात्रीच्या दिवशी खाली दिलेल्या विधी प्रमाणे पूजा केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते. जाणून घेऊया पूजेचा मुहूर्त आणि उपासना पद्धती.

Masik Shivratri February 2024 : उद्या मासिक शिवरात्री, अशाप्रकारे करा महादेवाची आराधना
शिवलिंग
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मासिक शिवरात्रीचे (Masik Shivratri) व्रत उद्या म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 रोजी पाळले जाईल, ही वर्षातील दुसरी मासिक शिवरात्री आहे. या दिवशी भक्त भगवान शिवाच्या कुटुंबाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री शिवलिंगाच्या रूपात भगवान शिवाचा जन्म झाला होता, असे सांगितले जाते. मासिक शिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी भगवान शंकराची पूजा करण्यासोबत ही कथा अवश्य वाचावी.

मासिक शिवरात्री व्रत 2024 शुभ मुहूर्त

  • माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी सुरू होते – 8 फेब्रुवारी सकाळी 11:17 पासून
  • माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी समाप्त होते – 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.02 वाजता
  • मासिक शिवरात्री उपवास तारीख – 8 फेब्रुवारी 2024
  • मासिक शिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्म मुहूर्त – सकाळी 05.21 ते 06.13 पर्यंत
  • भगवान शिवाच्या पूजेसाठी निशिता मुहूर्त – 8 फेब्रुवारी रोजी रात्री 12:09 ते सकाळी 01:01 पर्यंत
  • मासिक शिवरात्री व्रत उपासना पद्धत
  • मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठणे, आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालावेत.
  • यानंतर सूर्याला जल अर्पण करा.
  • आता देवघर स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा.
  • चौरंगावर शिवलिंग किंवा शिव कुटुंबाचे चित्र ठेवा.
  • भगवान शंकराला पाणी, कच्चे दूध, गंगाजल, बेलपत्र, धतुरा, भांग, अगरबत्ती, फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा.
  • महादेव भोलेनाथासमोर तुपाचा दिवा लावावा.
  • त्यानंतर शिव चालिसा आणि भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा.
  • शेवटी भगवान शंकराची आरती करून प्रसाद अर्पण करावा.
  • प्रदोष व्रतामध्ये भोले शंकरासह पार्वतीची पूजा करावी.
  • प्रदोष व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आरती करून फळे खावीत.
  • मासिक शिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये
  • शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नका.
  • शिवरात्री व्रताच्या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नका. मोठ्यांचा अपमान करू नका.
  • मासिक शिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत.
  • मासिक शिवरात्रीच्या दिवशी गहू, डाळ आणि तांदूळ दान करू नये.
  • मासिक शिवरात्रीच्या दिवशी तामसिक गोष्टींपासून दूर राहा.
  • पंचामृतात तुळशीचा वापर करू नये. भगवान शंकराला तीळही अर्पण करू नका.

भगवान शिवाच्या या मंत्रांचा जप करा

  • ओम नमः शिवाय
  • ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनानां मृत्युोर्मक्षिय ममृतात् ॥
  • ॐ नमो भगवते रुद्राय
  • ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय