सांगली : संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा (Dindi Sohala) हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. हातात भगवे ध्वज, वारकऱ्यांचा पारंपरिक वेश, टाळ मृदंग वाजवत, ढोल ताशांचा गजर, करणारे चिमुकले, अबालवृद्ध, नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस, मुखी ज्ञानोबा माऊली यांचा जयघोष करीत ज्ञानोबा – माऊलींची दिंडी पलूसचे आराध्य दैवत श्री धोंडीराज महाराज मंदिरापासून निघाली. या दिंडी चे संयोजन श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
‘विठाई माझी, माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो माझा ज्ञानोबा’ अशा असंख्य अभंगांनी हि दिंडी भक्तिरसात न्हाहून निघाली.अशा भक्तिमयवातावरणात हा दिंडी सोहळा आमणापूर रोडवरील माऊली मठाकडे प्रशस्त झाला. दिंडीमध्ये सजवलेल्या माऊलीच्या अश्वाचा समावेश होता. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या दिंडी सोहळ्याने संपूर्ण पलूस शहरात सगळीकडे मांगल्याचे आणि चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.
शहरातील भाविकांनी दिंडीच्या पायावर पाणी घालत, पदस्पर्शकरीत भक्तीभावाने माऊलीच्या मुर्तीचे दर्शन घेतले. यावेळी महिला वर्गाने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या दिंडीमागे हार फुलांनी सजवलेल्या रथातून आणलेली श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मनमोहक मुर्ती माऊली मठामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. पलूस आमणापूर रोड वरील विठ्ठलवाडी रेल्वे गेटजवळ भव्य माऊली मठाचे निर्माण होत आहे.
या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची 108 फुटांची भव्यदिव्य मुर्ती विराजमान करण्याचा संकल्प
श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी बाळकृष्ण पवार यांनी केला आहे.