Vivah Muhurat 2021 | मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त, जाणून घ्या शुभ तारखा

| Updated on: Apr 29, 2021 | 10:17 AM

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त मानला जातो (Maximum Wedding Muhurat In May). हिंदू धर्मात, विवाह हे एक असे कार्य आहे जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही तर दोन कुटुंबांना जोडते.

Vivah Muhurat 2021 | मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त, जाणून घ्या शुभ तारखा
marriage Image
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त मानला जातो (Maximum Wedding Muhurat In May). हिंदू धर्मात, विवाह हे एक असे कार्य आहे जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही तर दोन कुटुंबांना जोडते. म्हणूनच लग्नाशी संबंधित सर्व शुभ कार्ये शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहून केल्या जातात. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून ग्रहांची स्थितीपासून ते त्यांचे किती गुण मिळतात या सर्वांचं मूल्यांकन केले जाते (Maximum Wedding Muhurat In May Month Know The All Shubh Muhurat).

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी लग्नाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त मे महिन्यात येत आहे. लग्नाच्या बाबतीत गुरु आणि बुध महत्त्वपूर्ण मानले जातात. ज्योतिशास्त्राच्या मते जेव्हा शुक्र तारा अस्त होतो तेव्हा विवाहसंबंधी कार्य केले जात नाहीत. याशिवाय खरमामध्येही कोणतेही शुभ कार्य होत नाही.

पंचागानुसार, यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी कोणताही शुभ काळ नव्हता. 22 एप्रिलपासून लग्नाचे शुभ मुहूर्त सुरु झाले आहे. वास्तविक 28 एप्रिलपासून वैशाख महिना सुरु झाला आहे. हा महिना सर्वोत्तम मानला जातो. कोणतेही शुभ कामे करण्यासाठी हा महिना सर्वात शुभ आहे.

चला मे महिन्यात लग्नाच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया –

? 2 मे
? 4 मे
? 7 मे
? 8 मे
? 21 मे
? 22 मे
? 23 मे
? 24 मे
? 26 मे
? 29 मे
? 31 मे

कधी विवाह केले जात नाहीत

धार्मिक मान्यतेनुसार, मांगलिक कामे खरमास, मलमास, गुरु आणि शुक्रा तारा अस्त झाल्यानंतर आणि देवशयनीच्या वेळी शुभ कार्य केले जात नाहीत. केवळ विवाहच नाही तर इतर शुभ कामंही या केली जातात. तथापि, लग्नाचा शुभ काळ 22 एप्रिलपासून सुरु झाला आहे. यावर्षी 15 जुलैपूर्वी म्हणजे देवशयनपूर्वी 37 विवाह मुहूर्त आहेत. त्यानंतर 15 नोव्हेंबरला देवउठनी एकादशीपासून 13 डिसेंबरपर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त राहतील.

Maximum Wedding Muhurat In May Month Know The All Shubh Muhurat

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Varuthini Ekadashi 2021 | ज्या व्रतामुळे महावेदांना शापातून मुक्तता मिळाली ती वरुथिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

Lord Vishnu | भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, तर गुरुवारी ‘या’ मंत्रांचा जप करा…