Mohini Ekadashi 2021 : सुख-समृद्धी, आनंद हवाय? मोहिनी एकादशीला हे उपाय करा…

| Updated on: May 20, 2021 | 3:51 PM

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरुपाची (Mohini Ekadashi 2021) पूजा केली जाते.

Mohini Ekadashi 2021 : सुख-समृद्धी, आनंद हवाय? मोहिनी एकादशीला हे उपाय करा...
Mohini Ekadashi
Follow us on

मुंबई : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरुपाची (Mohini Ekadashi 2021) पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अमृताला दानवांपासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप धारण केले आणि दानवांकडून अमृत कलश घेऊन ते देवतांना दिले. मान्यता आहे की, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथी होती. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले (Mohini Ekadashi 2021 Do These Upay On This Day For Good Fortune Wealth).

यावेळी मोहिनी एकादशीचा व्रत 23 मे 2021 रोजी केले जाईल. मान्यता आहे की, या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दु:ख दूर होतात आणि व्यक्ती मोहाच्या बंधनातून सुटून मोक्षच्या मार्गाने अग्रेसर होतात. ज्योतिष तज्ञांच्या मते, जर आपण उपवास करु शकत नसाल, तर या दिवशी काही उपाय करुन आपण नारायण आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. यामुळे घरात संपत्ती, सौभाग्य, आरोग्य, आनंद आणि शांती येते. चला जाणून घेऊया त्या उपायांबद्दल –

घरात सुख-शांती आणण्यासाठी

मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर ठेवावा. त्यानंतर, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करुन तुळशीभोवती 11 वेळा परिक्रमा करा. असे केल्याने घरात सुख-शांती राहाते आणि आनंद येतो.

कर्जातून मुक्त होण्यासाठी

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला स्वतःचे स्वरुप सांगितलं आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी द्या आणि तुपाचा दिवा लावा. यानंतर, नारायण यांचे स्मरण करताना पिंपळाच्या झाडा भोवती सात वेळा परिक्रमा करा. यामुळे कर्जातून मुक्तता मिळते.

सौभाग्य प्राप्तीसाठी

एकादशीच्या दिवशी नारायण आणि देवी लक्ष्मीच्या छायाचित्राची पूजा करावी आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. यानंतर भगवान विष्णूंना पिवळे फळं, पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळे धान्य अर्पण करा आणि नंतर या सर्व गोष्टी दान करा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीचं भाग्य उजळतं आणि हळूहळू त्यांची सर्व कामं पूर्ण होतात.

कोणत्याही प्रकारच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी

फक्त मोहिनी एकादशीच नाही तर कोणत्याही एकादशीच्या दिवशी भगवान नारायण आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यानंतर श्रीमद्भागवतचं पठण करा. याद्वारे सर्व प्रकारचे दु:ख दूर होतात.

आर्थिक संकटं दूर करण्यासाठी

भगवान नारायणाचे शंखाने अभिषेक करा आणि त्यांना आणि देवी लक्ष्मीला खीरचं नैवेद्य लावा. तुळशीची पाने नारायणाला समर्पित करा. यानंतर तुळशीच्या माळेने 108 वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. पूजेनंतर देवाला आपल्या घरातील आर्थिक संकटं दूर करण्याची प्रार्थना करावी.

Mohini Ekadashi 2021 Do These Upay On This Day For Good Fortune Wealth

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

Numerology | बुद्धिमान असूनही ‘या’ अंकांच्या व्यक्तींना मिळत नाही यश, संपूर्ण आयुष्यच संघर्षमय