मोहिनी एकादशी
Image Credit source: Social Media
मुंबई : मोहिनी एकादशीचे (Mohini Ekadashi 2023) व्रत आज, सोमवार, 1 मेला आहे. एकादशी व्रत भगवान विष्णूला समर्पित आहेत आणि यापैकी काही एकादशींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मोहिनी एकादशी हादेखील असाच खास दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूने समुद्रमंथनातून अमृताचे रक्षण केले आणि राक्षसांपासून वाचवून देवतांना दिले. यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला. आज मोहिनी एकादशीच्या दिवशी रवियोग आणि ध्रुव योग असे शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज मोहिनी एकादशीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे भगवान विष्णूची अपार कृपा होईल. यासोबतच सर्व संकटे आणि अडथळे दूर होतील.
एकादशीसाठी प्रभावी उपाय
- आज मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची तसेच तुळशीजींची पूजा करा. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचे ५ दिवे लावावेत. तसेच तुळशीच्या 11, 21 परिक्रमा करा. यादरम्यान ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. यासोबतच घरात सुख-शांती नांदते. नकारात्मकता निघून जाते. पण या काळात तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्श करू नका हे लक्षात ठेवा. कारण तुळशी एकादशीच्या दिवशीही उपवास करते आणि जल अर्पण करून तिचा उपवास तोडला जातो.
- आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला साखर मिसळलेले पाणी अर्पण करावे. तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात.
- आज मोहिनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरून भगवान विष्णूंचा अभिषेक करावा. तसेच लक्ष्मीची पूजा करावी. यानंतर विष्णुसहस्त्रनाम आणि श्रीसूक्ताचे पठण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील, ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर होईल. नशिबाच्या मदतीने तुमची कामे मार्गी लागतील.
- लग्नात विलंब किंवा अडथळा येत असेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. तसेच पिवळी फळे, पिवळी मिठाई दान करा. तसेच भगवान विष्णूंना केशरमिश्रित दुधाचा अभिषेक करावा.
- भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळे शंख अर्पण करा, नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. पैसा झपाट्याने वाढेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)