Money Tips: देवघरात ठेवा ही लहानशी गोष्ट, कुबेराच्या कृपेने भरेल तिजोरी!

| Updated on: Feb 02, 2023 | 9:29 AM

विष्णू पुराणानुसार देव आणि दानवांनी अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले. ज्या दरम्यान 14 अनमोल रत्ने प्राप्त झाली, त्यात शंख देखील एक अनमोल रत्न होते.

Money Tips: देवघरात ठेवा ही लहानशी गोष्ट, कुबेराच्या कृपेने भरेल तिजोरी!
देवघर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार देव घरात ठेवलेल्या अनेक गोष्टी तुमचे निद्रिस्त नशीब जागृत करू शकतात.  ज्योतीषशास्त्रात (Astro money Tips) काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे कुबेरांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील. त्याचप्रमाणे  देवघरातील मुख्य गोष्ट म्हणजे शंख, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत पवित्र मानला जातो. कोणत्याही प्रकारची पूजा किंवा धार्मिक विधी तसेच शुभ कार्यात शंखनाद अत्यंत पवित्र मानला जाते. यामागे अनेक पौराणिक मान्यता आहेत आणि समुद्रमंथनाची प्रसिद्ध कथा देखील आहे. विष्णू पुराणानुसार देव आणि दानवांनी अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले. ज्या दरम्यान 14 अनमोल रत्ने प्राप्त झाली, त्यात शंख देखील एक अनमोल रत्न होते. या कारणास्तव शंख अत्यंत पवित्र मानला जातो.

काय आहेत शंखासंबंधीत उपाय?

  1.  जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल किंवा थकीत कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर तुम्ही सर्व नियम व विधीचे पालन करून तुमच्या पूजागृहात दक्षिणावर्ती शंख स्थापित करा. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असेल तर कुबेर आणि माता लक्ष्मीचा तेथे सदैव वास असतो आणि शुभ फळ प्राप्त होतात अशी धार्मीक श्रद्धा आहे.
  2. तुमच्या पूजागृहात शंख अवश्य ठेवा. असे मानले जाते की, ज्या घरामध्ये दररोज शंख वाजविला जातो, तेथे कधीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही. यासोबतच घरामध्ये लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा राहते.
  3. शंख कधीही रिकामा ठेवू नका. शंख ठेवलेल्या ठिकाणी तांदूळ ठेवा. असे केल्याने कुबेरांचा निवास तुमच्या घरात नेहमी राहील आणि तिजोरी कधीही रिकामी होणार नाही.
  4.  दररोज पूजेनंतर शंखनाद करावा. घरातील वातावरणात शंखध्वनी कायम राहतो. वाईट शक्ती तिथे राहत नाहीत. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
  5. शंखनाद केल्यानंतर तो पाण्याने स्वच्छ धुवावा, यानंतर त्यात पाणी टाकून संपूर्ण घरात (शौचालय वगळता) ते पाणी शिंपडा. असे केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरात शांती नांदते. कुटुंबातील सदस्यांच्या एकूण उत्पन्नातही वाढ होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)