प्रयागराज महाकुंभमेळ्यात साधुसंतांचा मेळावा भरला आहे. 144 वर्षानंतर महाकुंभमेळा असल्याने याचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे देशविदेशातील आस्था असणाऱ्या लोकांचं या कुंभमेळ्याकडे लक्ष लागून आहेत. साधुसंताच्या विविध तऱ्हा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. असं असताना महाकुंभ मेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी साध्वी हर्षा रिछारिया रथावर आरूढ होत पोहोचली होती. यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती. हर्षा साध्वी होण्यापूर्वी एक अँकर होती. त्यामुळे हर्षाने असं अचानक साध्वी होण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आस्था आणि अध्यात्म्याच्या मार्गावर तिने आपलं पाऊल कसं टाकलं असे प्रश्न तिला पाहता क्षणीच पडतात. चला जाणून घेऊयात हर्षा रिछारियाबाबत.. तिचे गुरु कोण आणि आणि कोणत्या आखाड्यातून आहे ते सर्व
हर्षा रिछारिया ही एक सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि अँकर होती. ती दोन वर्षापूर्वीच साध्वी झाली आहे. हर्षा रिछारियाचे गुरु आचार्य महामंडळेश्वर स्वामी श्री कैलाशानंद गिरीजी महाराज आहेत. ते निरंजनी आखाड्यातून येतात. उत्तराखंडमध्ये राहणारी हर्षा रिछारिया पूर्णपणे साध्वी झालेली नाही. तिने सांगितलं की, साध्वी होण्यासाठी सध्या तिचं मार्गक्रमण सुरु आहे. अजूनही तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही. हिंदू धर्मात नागा साधु संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरुंकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे. हर्षा रिछारियाला अजूनही दीक्षा मिळालेली नाही.
कैलाशानंद गिरीजी महाराज निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडळेश्वर आहेत. त्यांनी लाखो नागा साधु आणि हजारो महामंडळेश्वरांना दीक्षा प्रदान केली आहे. स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराज एक महान आणि तपस्वी संत आहेत. ते ज्ञान आणि तपाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध आहेत.