हिंदू धर्मात कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. काही मुहूर्त टाळले जातात. कारण त्यावेळेस केलेलं कोणतंही कार्य फळास येत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यातील पाच दिवस कोणतंही शुभ कार्य करण्यास उचित मानले जात नाहीत. या पाच दिवसांना पचक मानलं जातं. पण हे पंचक कोणत्या वाराला सुरु झालं आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यावरूनच शुभ कार्य करू शकतो की नाही हे ठरवलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत अवघ्या अडीच दिवसात प्रवास करतो. जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्ररा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रातून प्रवास करतो. या प्रवासासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो त्याला पंचक संबोधलं जातं. विशेष म्हणजे या प्रवासाला शनिवारी सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे पंचक सर्वात भीतीदायक मानलं जातं.
द्रिक पंचांगानुसार, 7 डिसेंबरला शनिवारी सकाळी 5 वाजून वाजून 7 मिनिटांनी पंचक सुरु होईल. हे पंचक 11 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्यातील कोणत्या वाराला पंचक लागतं यावरून त्याची वर्गवारी केली जाते. शनिवारी सुरु होणाऱ्या पंचकाला मृत्यूपंचक संबोधलं जातं. हे पंचक सर्वात त्रासदायक असते. दुसऱ्या पंचकांच्या तुलनेत पाचपट अधिक अशुभ परिणाम देते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)