Mumbai: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी! यंदा गणेश मूर्तीच्या उंचीचं बंधन नाही

| Updated on: Jun 28, 2022 | 1:11 PM

मुंबई, गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) या वर्षी मात्र धूमधडाक्यात साजरा होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची (Ganesh murti Height) आणि नियमांचे बंधन राहणार नाही. मात्र मूर्ती पर्यावरणपूरकच राहणार आहे. याबाबत शिवसेना आणि गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद […]

Mumbai: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी! यंदा गणेश मूर्तीच्या उंचीचं बंधन नाही
गणेशोत्सवासाच्या परवानगीसाठी 1200 मंडळाचे अर्ज, 500 मंडळांना परवानगी; 23 ऑगस्टपर्यंत मुदत
Follow us on

मुंबई, गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साध्या पद्धतीने साजरा झालेला गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) या वर्षी मात्र धूमधडाक्यात साजरा होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीची उंची (Ganesh murti Height) आणि नियमांचे बंधन राहणार नाही. मात्र मूर्ती पर्यावरणपूरकच राहणार आहे. याबाबत शिवसेना आणि गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दिली. सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला गणेशोत्सव (ganesh chaturthi 2022) अवघ्या दोन महिन्यांवर आला असून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे 2020 मध्ये “पीओपी’च्या मूर्तीवर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

घरगुती मूर्ती 2 फुटांची करा – पालिकेचे आवाहन

घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी सुमारे 150 हून जास्त कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. या
तलावात 2 फुटांच्या मूर्तींचे विसर्जन करणे सोयिस्कर ठरते.  त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांच्याच कराव्यात असे आवाहन
आणि विनंती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शिवाय प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची विक्री किंवा खरेदी करू नये असे आवाहनही पालिकेने केले आहे.

शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे

शाडू माती पर्यावरणपूरक आहे, तसेच कोणत्याही घातक रसायानाचा अंश या मातीत नाही. त्यामुळे या मूर्तीचे विघटन अतिशय सोप्या पध्दतीने होते. मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणताही रासायनिक वा जैविक प्रभाव जलस्त्रोतावर होत नाही.

हे सुद्धा वाचा

शाडू मातीच्या मूर्तीतील रुपे

सध्या शाडू मातीच्या मूर्तींची विविध रुपे बघायला मिळत आहेत. त्यात लालबागचा राजा, बालगणेश, राजसिंहासन, पेशवाई, नवश्या गणपती, अष्टवनिायकातील सर्वच रुपे, जास्वंद गणेश, मल्हार गणेश आदींचा समावेश आहे.

पर्यावरणपूरक मूर्ती

शाडूच्या गणपतीत वैविध्य आणतानाच कलाकुसर करण्यास अधिक वाव असतो. या मूर्तीमुळे जलप्रदूषण होत नाही. ही मूर्ती घरच्या घरी बादलीभर पाण्यातही विसर्जित करता येते. पर्यावरण संवर्धनासोबतच शास्त्रानुसारही शाडूच्या मातीचे गणपती बनविणे योग्य आहे. गणपतीची मूर्ती ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभुतांमध्ये विलीन झाली पाहिजे, असे शास्त्र सांगते. यासाठी शाडू मातीची मूर्ती बनविली गेली पाहिजे.