Mumbai To Ayodhya : मुंबईहून अयोध्येला जायचे आहे? हे पर्याय आहेत उपलब्ध, येईल इतका खर्च

| Updated on: Dec 21, 2023 | 2:31 PM

रामाची अयोध्या उभारताना पाहणे ही एक मोठी संधी आहे, त्यामुळेच देशभरातून मोठ्या संख्येने लोक येथे पोहोचत आहेत. मंदिराच्या उद्घाटनानंतर ही संख्या चौपट होईल आणि दररोज एक लाख भाविक अयोध्येला पोहोचतील अशी अपेक्षा आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील मुंबईतून अयोध्येला (Mumbai to Ayodhya Train) जाण्याचे पर्याय सांगणार आहोत.

Mumbai To Ayodhya : मुंबईहून अयोध्येला जायचे आहे? हे पर्याय आहेत उपलब्ध, येईल इतका खर्च
अयोध्या
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. प्राणप्रतिष्ठापूर्वीच मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला पोहोचत आहेत. विशेषत: रामलल्लाच्या नवीन संकुलाचे काम पाहण्यासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमधून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.  भाविकांनी सांगितले की, रामाची अयोध्या उभारताना पाहणे ही एक मोठी संधी आहे, त्यामुळेच देशभरातून मोठ्या संख्येने लोक येथे पोहोचत आहेत. मंदिराच्या उद्घाटनानंतर ही संख्या चौपट होईल आणि दररोज एक लाख भाविक अयोध्येला पोहोचतील अशी अपेक्षा आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील मुंबईतून अयोध्येला (Mumbai to Ayodhya Train) जाण्याचे पर्याय सांगणार आहोत.

मुंबई ते अयोध्या रेल्वे

ट्रेनने गेल्यास 1000 ते 4000 रुपये मोजावे लागतील. ट्रेन व्यतिरिक्त, मुंबई ते अयोध्येला अनेक बसेस देखील धावतात, ज्यातून कोणीही प्रवास करू शकतो आणि रामलालाचे दर्शन घेऊ शकतो.

मुंबई ते अयोध्या बसेस

ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा बसने प्रवास करण्यात जास्त वेळ लागतो. फ्लाइटबद्दल बोलायचे तर, यास 2 तास लागतील आणि या प्रवासासाठी तुम्हाला जवळपास 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतील.

हे सुद्धा वाचा

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य रेल्वे स्थानकाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या प्रत्येक सुविधेची काळजी घेतली जात आहे. पीएम मोदी महिन्याच्या शेवटी राम मंदिराच्या दर्शनासह आधुनिक वास्तू आणि सर्व आधुनिक सुविधांनी युक्त स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत. अयोध्येला वेगवेगळ्या भागातून गाड्या सुरू करण्याची योजना आहे आणि त्यात एक नव्हे तर डझनभर गाड्यांचा समावेश आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी 19 जानेवारीपासून गाड्या सुरू होतील.