मुंबई : देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन शिव मंदिर हे उत्तराखंडमध्ये स्थित (Four Ancient Temples Of Lord Shiva) केदारनाथ मंदिराला मानलं जातं. पण, भारताच्या कानाकोपऱ्यात काही अशीही प्रसिद्ध आणि प्राचीन शिव मंदिर आहेत जिथे तुम्ही एकदातरी भेट द्यायला हवी (Must Visit These Four Ancient Temples Of Lord Shiva In India).
भारताच्या वेगवेगळ्या शिव मंदिरांना महाकाल मंदिर, नटराज मंदिर आणि महादेव मंदिराच्या नावाने ओळखलं जातं. जर तुम्ही इतिहास प्रेमी असण्यासोबतच धार्मिक असाल तर तुम्ही भारतातील या प्रमुख शिव मंदिरांमध्ये एकदा नक्की जा.
केदारनाथ मंदिरानंतर भारतात सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक गुजरातचं सोमनाथ मंदिर असल्याची मान्यता आहे. अनेक लोक मानतात की भगवान शिवला समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमनाथ मंदिरही आहे. सोमनाथ मंदिरात करोडो भारतीय आणि विदेशी शिव भक्त दर्शनासाठी येत असतात. समुद्र किनाऱ्यावर स्थित असलेलं हे शिव मंदिर चालुक्य शैली वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं. जर तुम्ही गुजरात फिरायला गेला तर तुम्ही सोमनाथ मंदिरात नक्की जा.
मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेशसह संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरांपैकी एक आहे. केदारनाथ, सोमनाथ व्यतिरिक्त महाकालेश्वर मंदिरही भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाते. या मंदिराची पवित्रता पाहता अनेकजण उज्जैनला महाकालची नगरी म्हणूनही संबोधित करतात. या मंदिराबाबत एक मान्यता आहे की येथे मृतांच्या भस्माने महाकालचा शृंगार केला जातो.
झारखंडच्या देवघर येथील सर्वात प्राचीन आणि सर्वात पवित्र मंदिर बाबा बैद्यनाथ धाम आहे. श्रावण महिन्यात येथे लाखो भक्त सुल्तानजग येथून पाणी भरुन बाबा बैद्यनाथ धामसाठी जातात. जवळपास 42 किलोमीटर पाणी आणून लाखो भक्त बाबा बैद्यनाथ धामला समर्पित करण्यासाठी जातात. या मंदिराच्या परिसरात जवळपास 20 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. बाबा बैद्यनाथ धामच्या समोर पार्वतीचं एक सुंदर मंदिर आहे.
भारतातील 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांपैकी एक आहे काशी विश्वनाथ मंदिर. हे मंदिर बनारसमध्ये स्थित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे इतर मंदिरांमधून शोभा यात्रा, ढोल ताशांसोबत बाबा विश्वनाथजींच्या मंदिरात येते. या मंदिराबाबत मान्यता आहे की जो काशी विश्वनाथमध्ये शेवटचा श्वास घेतो तो पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होऊन जातो.
जेव्हा पांडव आणि महादेव यांच्यात युद्ध झालं, जाणून घ्या नेमकं काय झालं होतं?https://t.co/Vc59mzNrAO#Mahabharata #Mahadev #Pandav
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
Must Visit These Four Ancient Temples Of Lord Shiva In India
संबंधित बातम्या :
Chaitra Navratri 2021 | घट स्थापनेच्या दिवशी शुभ योग, हे उपाय करा, कौटुंबिक आणि आर्थिक समस्या सुटतील
सूर्य देवाचा जन्म कसा झाला?, जाणून घ्या पौराणिक कथा
Somvati Amavasya 2021 | सोमवती अमावस्या कधी, जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त…