इटलीमध्ये पाण्याखाली सापडले रहस्यमयी पुरातन मंदिर, कोणत्या देवाचे आहे हे मंदिर?

| Updated on: Apr 14, 2023 | 4:15 PM

नबातियन हे रोमन साम्राज्याचे एक मैत्रीपूर्ण साम्राज्य होते. रोमन काळात, नबातियन साम्राज्याचा विस्तार युफ्रेटिस नदीपासून लाल समुद्रापर्यंत होता.  अरबी द्वीपकल्पात पेट्रा वाळवंटात असलेली बातियन साम्राज्याची राजधानी होती.

इटलीमध्ये पाण्याखाली सापडले रहस्यमयी पुरातन मंदिर, कोणत्या देवाचे आहे हे मंदिर?
इटली
Image Credit source: Social Media
Follow us on

रोम :  इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांना दक्षिण इटलीतील पोझुओली बंदराजवळ एका अतिशय प्राचीन मंदिराचे (Ancient Temple in Italy) अवशेष पाण्याखाली सापडले आहेत. या मंदिराचे अवशेष पाहून प्रत्येकजण थक्क होत आहे. या मंदिराच्या काही भागांची तपासणी केली असता असे आढळून आले आहे की येथे सापडलेल्या वस्तू आणि मंदिराचे अवशेष हे नबताई संस्कृतीशी संबंधित असलेल्या मंदिराचे आहेत.

पर्वतांच्या देवाचे मंदिर

नबातियन हे रोमन साम्राज्याचे एक मैत्रीपूर्ण साम्राज्य होते. रोमन काळात, नबातियन साम्राज्याचा विस्तार युफ्रेटिस नदीपासून लाल समुद्रापर्यंत होता.  अरबी द्वीपकल्पात पेट्रा वाळवंटात असलेली बातियन साम्राज्याची राजधानी होती. नाबॅटियन साम्राज्याचा विस्तार पोझुओली बंदरापर्यंतही झाला, जे रोमन भूमध्यसागरीयातील सर्वात मोठे व्यापारी बंदर होते.

18 व्या शतकाच्या मध्यात, प्राचीन पोझुओलीच्या भागामध्ये नबातियन देवतेला माननारे अनेक लोक होते. येथे नबातियनचे राज्य होते.  प्राचीन काळी फक्त नबताई समाजातील लोकच या देवतेची पूजा करत असत. मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर आता पुढील शोधकाम सुरू करण्यात आले आहे. मंदिराची आणखी माहिती गोळा केली जात आहे. यामुळे इटलीच्या प्राचीन शहराचा इतिहास आणि त्याचे आणखी काही पैलू समोर येऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

मंदिर पाण्याखाली कसे गेले

त्या दिवसांत पोझुओली पुतिओली म्हणून ओळखले जात असे. हे ठिकाण कॅम्पानियामधून निर्यात होणाऱ्या मालाचे मुख्य केंद्र होते. नबताईंनी, या पुतिओलीमध्ये त्यांचा तळ बनवून, त्यांच्या संरक्षक देवतेला समर्पित मंदिर बांधले. हे क्षेत्र सक्रिय ज्वालामुखीच्या क्षेत्राजवळ होते, ज्याच्या उद्रेकाने पुतिओलीचा एक भाग बुडविला असल्याचे मानले जाते.

सांस्कृतिकमंत्र्यांनी केला आनंद व्यक्त

नवीन शोधानंतर मंदिराशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात आहे. जे इटलीच्या या प्राचीन शहराच्या मातीत गाडलेले इतिहासाचे आणखी काही पदर उघडू शकतात. या शोधाबद्दल आनंद व्यक्त करताना इटलीचे सांस्कृतिक मंत्री म्हणाले, ‘प्राचीन पोझुओली येथून आणखी एक खजिना सापडला आहे, जो त्याचे सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक महत्त्व दर्शवतो.’

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)