मुंबई : भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी रहस्यांनी भरलेली आहेत. याशिवाय काही मंदिरे हे अनोख्या परंपरेसाठी ओळखली जातात. आज आपण अशाच एका रहस्यमय मंदिराविषयी जाणून घेणार आहोत, जेथे मंदिरात भक्तांना थेट प्रवेश दिला जात नाही. अशी अनोखी परंपरा उत्तराखंडमध्ये असलेल्या लाटू मंदिरात (Mysteries Temple) अनेक वर्षांपासून सुरू आहे. उत्तराखंडच्या लाटू मंदिरात देवाचे थेट दर्शन घेता येत नाही. यामुळेच मंदिराचा पुजारी भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधतो.
हे अनोखे मंदिर उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील देवल ब्लॉकमधील वाना येथे आहे. लाटू मंदिरात लाटू देवतेची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, स्थानिक लोकं लाटू देवता यांना उत्तराखंडच्या नंदा देवीचे धार्मिक भाऊ मानतात आणि त्यांची अपार भक्तीभावाने पूजा करतात.
असे मानले जाते की लाटू मंदिरात नागराज आपले रत्न घेऊन बसले आहेत आणि रत्नाचा तेजस्वी प्रकाश भक्ताला आंधळा करू शकतो. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुजारी भाविकांच्या डोळ्यावर पट्टी बांधतात.
लाटू मंदिरात वर्षभर प्रवेश मिळत नाही. या मंदिराचे प्रवेशद्वार वैशाख महिन्यातील पौर्णिमेला उघडते. सर्व भक्त दुरूनच देवतेचे दर्शन घेतात. या दरम्यान मंदिराचे पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून मंदिरात प्रवेश दिला जातो.
विष्णु सहस्त्रनाम आणि भगवती चंडिका याचे लाटू मंदिरात पाठ केले जातात. मार्शषीश अमावस्येला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तुम्हालाही या प्रसिद्ध आणि रहस्यमयी मंदिरात जायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला चमोली गाठावे लागेल. दिल्लीहून बसने लाटू देवतेचे दर्शन घेता येणे शक्य आहे, तर ऋषिकेशमार्गे सुमारे 465 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)