मुंबई : नागा साधूंचे (Naga Sadhu) रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे आहे. ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे. नागा साधू दिसायलाही सामान्य साधूंपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. विशेषतः कुंभमेळ्यामध्ये नागा साधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. नागा साधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्यांना माहिती नाही. यापैकीच एक म्हणजे नागा साधूंचे अंतिम संस्कार!
सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाहीत. आता प्रश्न पडतो की नागा साधूही हिंदू धर्माचे पालन करतात मग त्यांचे मृतदेह का जाळले जात नाहीत.
असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षांचा कालावधी लागतो असे म्हटले जाते. नागा साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरावरील जंगलात राहातात. त्याचे निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाही.
असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात. या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही, असे म्हटले जाते की या शक्तीच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतो. यामुळेच कुंभमध्ये येणारे लोकं नागा साधूंना भेट देतात.
नागा साधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगरात घालवतात. त्याच्या मृत्यूनंतर, त्यांला भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भू समाधी देण्यात येते. नागा साधूंना सिद्धयोगाच्या आसनात बसून भू-समाधी दिली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)