मुंबई : हिंदू धर्मात सापांची देवता म्हणून पूजा केली जाते. नागपंचमी (Nagpachami 2023) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. याशिवाय नाग मंदिरीत दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला साजरी होणार आहे. नागपंचमीच्या वेळी भगवान शंकराच्या प्रिय अष्टनागांची पूजा केली जाईल. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय आहे. या रमणीय महिन्यात भोलेनाथाच्या प्रिय असलेल्या नागांची पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात. चला तर जाणून घेऊया नागपंचमीला कोणत्या आठ नागांची देवता म्हणून पूजा केली जाते.
वासुकी नाग हा भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानला जातो. तो शेषनागाचा भाऊ मानला जातो. असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी दोरीऐवजी वासुकी नागाचा वापर मेरप पर्वतावर बांधून केला गेला होता. हाच तो वासुकी नाग होता ज्याने भगवान श्रीकृष्ण लहानपणी वासुदेवाकडून नदी पार करत असताना त्यांचे रक्षण केले होते.
अष्टनागमध्ये अनंत नाग महत्त्वाचे मानले गेले आहेत. ते भगवान श्रीहरींचे सेवक मानले जातात. त्याला शेषनाग असेही म्हणतात. अनंत नागाच्या कुशीवर पृथ्वी वसलेली आहे असे मानले जाते. अनंत म्हणजे ज्याचा अंत होऊ शकत नाही. अनंत नाग हे प्रजापतीपासून उत्पन्न झाले
पद्म नाग आसाममध्ये नागवंशी म्हणून ओळखले जातात. पद्म नागाला महासर्प म्हणतात. असे मानले जाते की गोमती नदीजवळ पद्म नाग राज्य करत असे. पुढे हे साप मणिपूरमध्ये स्थायिक झाले.
महापद्म नागाला शंखपद्म असेही म्हणतात. त्याच्या फण्यावर त्रिशूळाची खूण आहे. महापद्म नागाचा रंग पांढरा असतो. विष्णु पुराणातही त्यांच्या नावाचे वर्णन आले आहे.
तक्षक नाग पाताळात राहतो असे मानले जाते. त्यांचे वर्णन महाभारतातही आले आहे. तक्षक नागाच्या आईचे नाव क्रुड आणि वडिलांचे नाव कश्यप आहे.
कुलीर नाग हा ब्राह्मण कुळातील मानला जातो. शास्त्रात त्यांचे जगत पिता ब्रह्माजी यांच्याशी असलेले नाते सांगितले आहे. कुलीर नाग हा अष्टनागांपैकी एक मानला जातो. नागपंचमीला त्यांची पूजा केली जाते.
कर्कट नाग हे शिवाचे गण मानले जाते. हा नाग खूपच भयानक दिसतो. कर्कट नागाची पूजा केल्याने कालीच्या शापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
अष्टनागांमध्ये, शंख नाग सर्वात तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेला आहे. अष्टनागांमध्ये शंख नागांना महत्त्वाचे स्थान मानले जाते. नागपंचमीच्या दिवशीही त्यांची पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)