Navratri 2022: नवरात्रोत्सव साजरा करण्यामागे पुराणातल्या ‘या’ दोन घटनांना आहे विशेष महत्त्व

| Updated on: Sep 22, 2022 | 11:34 AM

नवरात्राचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केली जाते. नवरात्रोत्सव साजरा करण्यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?

Navratri 2022: नवरात्रोत्सव साजरा करण्यामागे पुराणातल्या या दोन घटनांना आहे विशेष महत्त्व
नवरात्र २०२२
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, दरवर्षी शारदीय नवरात्रीची (Navratri 2022) सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होते. पितृ पक्षाच्या (Pitru Paksha 2022) समाप्तीपासून या पवित्र सणाची सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबरपासून सुरू होत असून 5 ऑक्टोबरला दसऱ्याने (Dussehra) समाप्त होईल. दरवर्षी सर्वजण शारदीय नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या थाटामाटात पूजा करतात आणि सुख, समृद्धी तसेच सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.  तुम्हाला माहित आहे का शारदीय नवरात्रीचा सण  का साजरा केला जातो. शारदीय नवरात्र साजरे करण्यामागे दोन पौराणिक घटनांचा उल्लेख आढळतो. याबद्दल जाणून घेऊया.

 

माता  दुर्गेने केला होता महिषासुराचा वध

पौराणिक कथेनुसार महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो ब्रम्हदेवाच्या मोठा भक्त होता. त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रम्हदेवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्याला ते वरदान दिले. वरदान मिळाल्यावर महिषासुराने विध्वंस करायला सुरुवात केली. त्याची दहशत एवढी वाढली की देवी-देवताही चिंतेत पडले. अशा स्थितीत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी मिळून माता दुर्गेला जन्म दिला. यानंतर संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.

हे सुद्धा वाचा

दुर्गा मातेने श्रीरामाला रावणाचा वध करण्याचे दिले होते वरदान

दुसरी आख्यायिका अशी आहे की, माता सीतेचे रावणाने हरण केले तेव्हा तिला परत आणण्यासाठी श्रीरामाला रावणाशी युद्ध करावे लागले. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामेश्वरममध्ये देवी दुर्गा शक्तीच्या रूपात नऊ दिवस पूजली जात होती. त्यांच्या भक्ती आणि उपासनेने प्रसन्न होऊन दुर्गा देवीने  श्री रामाला लंकेच्या विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर भगवान रामाने दहाव्या दिवशी रावणाचा वध केला. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीनंतर विजयादशमी हा सण साजरा केला जातो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)