मुंबई : रविवार, 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांवर आशिर्वादाचा अर्शाव करते. अशा काही गोष्टी आहेत ज्या नवरात्रीमध्ये घरी आणून मातेचा आशीर्वाद मिळवता येतो. या गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या नवरात्रीमध्ये घरात ठेवल्या तर नेहमी सुख-समृद्धी येते.
कलश
हिंदू धर्मात पूजेच्या वेळी कलशाचे खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही माती, पितळ, सोने किंवा चांदीचा कलश घरी आणावा. हे अत्यंत शुभ मानले जाते.
लाल चंदनाची माला
माता दुर्गाला लाल चंदनाची माळ खूप आवडते. नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घालून भक्त माँ दुर्गेच्या मंत्रांचा जप करतात. या वेळी नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घरी नक्की आणा. लाल चंदनाच्या जपमाळेने जप केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
दुर्गा देवीची मूर्ती
नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेकजण आपल्या घरी देवीची मूर्ती बसवतात. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही माता दुर्गेची मूर्ती घरी आणू शकता. याशिवाय घरातील मंदिरातही दुर्गेच्या पादुका ठेवता येतात. यामुळे भक्तांवर मातेची कृपा राहते.
साडी चोळी
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची साडी चोळी अर्पण करा. यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. दुर्गेच्या आशीर्वादाने घरात समृद्धी येते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)