मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण नवरात्र (Navratri 2023) सध्या सुरू आहे. नवरात्रीत हवनाला विशेष महत्त्व आहे. हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. मंदिरे, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे इत्यादी ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. घरी हवन कसे करायचे हे माहीत नसल्याने अनेकजण ते करत नाहीत. जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या बातमीत आपण हवनाची तयारी आणि मंत्राशी संबंधित माहिती जाणून घेऊया.
देवी भागवत पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे मंत्र आहेत. हवनाच्या वेळी दुर्गा सप्तशतीच्या 13 अध्यायांच्या मंत्रांचे पठण करताना हवनकुंडात स्वाहा म्हणत आहूती द्यावी. हवनकुंडात अग्नी प्रज्वलित करण्यापूर्वी त्यामध्ये फळे, मध, तूप, लाकूड इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावाने नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे आरोग्य आणि समृद्धी लाभते.
नवमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते. हवनासाठी लागणार्या पदार्थांमध्ये धूप, तांदूळ, सुके खोबरे, दही, आंब्याचे लाकडं, सुपारी, मध, तूप, अत्तर आणि अक्षत यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकत्र करा. हवन अग्नि प्रज्वलित करण्यासाठी कापूर आणि आंब्याच्या लाकडाचा वापर करा.
विटांच्या साहाय्याने अग्निकुंड तयार करा. त्याला शेणाने सारवा. त्यावर गंगाजल शिंपडा. पूजा साहित्यावरही गंगाजल शिंपडा. हवनकुंडात आहूती देण्यासाठी सुक्या आंब्याच्या लाकडाचा वापर करावा. तुपात भिजवलेला कापूस आणि कापूर जाळून हवनकुंडाची ज्योत पेटवा. यानंतर गणेशाला, पंचदेवता आणि नवग्रहांना ५ वेळा तूप अर्पण करावे. ओम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे नमः चा जप करा आणि हवनकुंडात अर्पण करा. शेवटी भात आणि मध एकत्र करून हवनकुंडात मंत्रासोबत अर्पण करा. हवनानंतर आरती करावी.
विटा आणि शेणाने सारवलेले हवनकुंड तयार करणे शक्य नसेल तर बाजारात तयार हवनकुंड देखील मिळतात. हे तुम्ही विकत घेऊ शकता किंवा एखाद्या बिछायत केंद्रातून भाड्यानेही आणू शकता. हवन करताना शुद्धता आणि पावित्र्य जपणे फार आवश्यक आहे. याशिवाय हवन झाल्यानंतर 12 वेळा विष्णवे न महाः या मंत्राचा जप करावा आणि पुजेत काही कमी राहीली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)