नवरात्री
Image Credit source: Social Media
मुंबई : सनातन धर्मात नवरात्रीच्या (Navaratri 2023) 9 दिवसांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. यापैकी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रोत्सव उत्साहात साजरे केले जातात, तर दोन गुप्त नवरात्रोत्सव आहेत. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात देवीच्या विविध रूपांची 9 दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी उदया तिथीमुळे, शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाने समाप्त होईल. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांना वेगवेगळे नैवेद्य दाखवू शकता.
नवरात्रीत देवीला दाखवा विशेष नैवेद्य
- पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला कलाकांदचा नैवेद्य दाखवावा. गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करणे शुभ असते.
- दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
- तिसर्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. तिसर्या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
- चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुआ अर्पण करावा. हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होईल.
- पाचव्या दिवशी माता स्कंदमातेला केळी अर्पण करावी.
- नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहे. या दिवशी देवीला सुपारी अर्पण करावी.
- सातव्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते. या दिवशी गुळाची मिठाई अर्पण करावी.
- आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी.
- नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी रव्याची खीर, पुरी आणि काळ्या हरभऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)