नवरात्री
Image Credit source: Social Media
मुंबई : अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची (Navratri 2023) सुरुवात होते आणि नवमीला समाप्त होते. यावर्षी नवरात्री 15 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून सुरू होत असून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या 9 दिवसात दुर्गा माताच्या 9 रूपांची पूजा केली जाणार असून दसऱ्याच्या दूसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. तसेच या दिवशी रावण दहन देखील केले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि घरात जवाच्या बिया पेरल्या जातात. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांना आनंद आणि सौभाग्याचे वरदान देते.
काय आहे यंदा देवीचे वाहन?
यंदा शारदीय नवरात्रीला दुर्गा देवी हत्तीवर स्वार होऊन येत आहे. देवीची हत्तीची सवारी शुभ मानली जाते. हत्तीची स्वारी सुख, समृद्धी आणि सौभाग्य आणते.
नवरात्री कलश स्थापना मुहूर्त
नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला, कलशाची विधीपूर्वक स्थापना केली जाते आणि 9 दिवस उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प केला जातो. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल.
घटस्थापनेचा विधी
- सर्वप्रथम एका मोठ्या मातीच्या भांड्यात थोडी स्वच्छ माती टाका आणि त्यात गव्हाचे दाणे टाका. यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडा.
- यानंतर मौली धागा कलशावर बांधून त्यावर स्वस्तिक काढावे.
- यानंतर थोडे पाणी घालून त्यात गंगाजल मिसळा.
- सुपारी, दुर्वा, अक्षत आणि 1 नाणे पाण्यात टाका.
- यानंतर फुलदाणीमध्ये आंब्याची पाच पानं ठेवा. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास अशोकाची पानेही ठेवू शकता.
- यानंतर, एक नारळ घ्या आणि लाल कपड्यात गुंडाळा. त्यात थोडे पैसेही बांधा.
- यानंतर, जमीन पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर, प्रथम मातीचे भांडे ठेवा ज्यामध्ये तुम्ही गहू पेरले आहे आणि नंतर त्यावर कलश स्थापित करा.
- यानंतर सर्व देवी-देवतांचे ध्यान करून पूजा सुरू करा.
शारदीय नवरात्री 2023 मध्ये 9 रूपांच्या पूजेचे दिवस
- 15ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा पहिला दिवस (देवी शैलपुत्रीची पूजा)
- 16 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा दुसरा दिवस (ब्रह्मचारिणी मातेची पूजा)
- 17 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा तिसरा दिवस (देवी चंद्रघंटाची पूजा)
- 18 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा चौथा दिवस (देवी कुष्मांडाची उपासना)
- 19 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा पाचवा दिवस (माता स्कंदमातेची पूजा)
- 20 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा सहावा दिवस (देवी कात्यायनीची पूजा)
- 21 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा सातवा दिवस (देवी कालरात्रीची उपासना)
- 22 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा आठवा दिवस (देवी सिद्धिदात्रीची उपासना)
- 23 ऑक्टोबर 2023: नवरात्रीचा नववा दिवस (देवी महागौरीची पूजा)
- 24 ऑक्टोबर 2023: दशमी तिथी (दसरा)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)