Navratri 2023 : नवरात्रीत घटस्थापना कधी आणि कशी करावी? शुभ मुहूर्त आणि स्थापना विधी

| Updated on: Oct 13, 2023 | 7:49 PM

नवरात्रोत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे. शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते, कलश स्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते. कलश स्थापनेचा अर्थ असा आहे की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाशस्वरूपाची पूजा करण्यासाठी घर, मंदिर आणि पंडालमध्ये घटस्थापना करतात.

Navratri 2023 : नवरात्रीत घटस्थापना कधी आणि कशी करावी? शुभ मुहूर्त आणि स्थापना विधी
नवरात्री
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्रोत्सव खूप खास मानला जातो, यंदा शारदीय नवरात्री (Shardiya Navratri 2023) 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्यात साजरा केला जातो, ज्यामध्ये 9 दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना देखील नवरात्रीच्या काळात विशेष महत्व मानली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, हा एक विशेष विधी आहे. ते योग्य मुहूर्तावर स्थापित करणे फार महत्वाचे आहे. घटस्थापनेसाठी स्वच्छ माती, मातीचे भांडे, सात प्रकारची धान्ये, लहान मातीचा किंवा पितळी कलश, गंगाजल, मौली धागा, अत्तर, सुपारी, कलशात ठेवण्यासाठी नाणे,  ५ आंब्याचे पानं, अक्षत, नारळ, लाल कापड, झेंडूची फुले आणि दुर्वा आवश्यक आहे.

घटस्थापना कशी करावी

कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावे, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 आंबे किंवा अशोकाची पाने ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा, पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा.

पूजा करण्यासाठी शुभ वेळ

नवरात्रोत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे. शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते, कलश स्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते. कलश स्थापनेचा अर्थ असा आहे की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाशस्वरूपाची पूजा करण्यासाठी घर, मंदिर आणि पंडालमध्ये घटस्थापना करतात. कलशस्थानाचा शुभ काळ प्रतिपदा तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होतो, परंतु मंदिर आणि पंडाल आपापल्या व्यवस्थेनुसार या घटस्थानाची पूजा करतात. अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात घटस्थापनाच्या अभिजीत मुहूर्तावर सकाळी 11:36 ते दुपारी 12:24 या वेळेत पूजा सुरू होते. यावेळी पुजारी सामुहीक पद्धतीनं पुजा कराता. या शुभ मुहूर्तावर सर्वजण पूजा कक्षात जातात आणि विधीनुसार पूजा सुरू करतात. याशिवाय अखंड ज्योत देखील प्रज्वलित केली जाते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)