मुंबई : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भक्त दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. याशिवाय नवरात्रीत (Navratri 2023) उपवासही केला जातो. नवरात्रीच्या पूजेमध्ये नारळ आणि सुपारीचाही प्रामुख्याने वापर केला जातो. पूजेमध्ये सुपारी आणि नारळाचे खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या पूजेमध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पूजेतील सर्व पदार्थांचे वेगळे महत्त्व आहे. त्याचबरोबर पूजेत वापरण्यात येणारी सुपारी ही गणेशाचे प्रतीक मानली जाते. पूजेत नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या पूजेमध्ये दोन्ही गोष्टींचा वापर केल्यास पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते.
असे मानले जाते की पूजा संपल्यानंतर पूजेच्या वेळी एखादी सुपारी सोबत ठेवली तर त्याचा फायदा होतो. ही सुपारी आपल्याजवळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. नवरात्रीच्या पूजेमध्ये सुपारीवर पवित्र धागा गुंडाळून त्याचा वापर करावा. यानंतर ही सुपारी पैशाच्या जागी ठेवा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.
नवरात्रीच्या पूजेमध्ये एकच नारळ वापरणे शुभ मानले जाते. या नारळाला एक छिद्र असते. त्याला मुख देखील म्हणतात. ज्या घरात नारळाचा अभिषेक केला जातो त्या घरात देवी लक्ष्मी वास करते. याशिवाय नवरात्रीमध्ये देवीसमोर एक नारळ ठेवून पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत माता लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय देखील आणली होती. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास आहे. नारळावर केलेल्या छिद्राची तुलना भगवान शंकराच्या डोळ्याशी केली जाते.
नारळाबाबत आणखी एक मान्यता अशी आहे की, नारळ हे विश्वामित्रांनी मानवी स्वरूपात तयार केले होते. एकदा विश्वामित्र इंद्रावर रागावले आणि दुसरे स्वर्ग निर्माण करू लागले. दुसरी सृष्टी निर्माण करताना त्यांनी मानवाच्या रूपात नारळ निर्माण केला. त्यामुळे नारळाच्या शेंड्याला बाहेरून दोन डोळे आणि एक तोंड असते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)