नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येकाची अशी इच्छा असते की येणारं नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाच जावं. वर्षाची सुरुवात चांगली जावी. नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच अनेक अपेक्षा असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये येणारं वर्ष हे भरभराटीचं जावं यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. याशिवाय असे काही संकेत आहेत, या घटना तुमच्यासोबत जर घडल्या तर येणारं वर्ष हे निश्चितपणे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या जर तुम्हाला दिसल्या तर ते अत्यंत शुभ मानलं जातं, अशाच काही गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
हे आवाज ऐकू येणं – नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा झोपेतून उठतात तेव्हा तुम्हाला शंखाचा ध्वनी ऐकू आला किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज आला तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत आहेत. येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप चांगल जाणार आहे, असं मानल जातं. यासोबतच जर सकाळी-सकाळी चिमणीचा चिवचिवाट तुमच्या कानावर पडला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो.
शुभ संकेत – जर वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला पक्षाचं घरट दिसलं, तर तुम्हाला या वर्षात काही तरी आनंदाची बातमी मिळेल याचा तो संकेत असतो.
शुभ फळ देणारी स्वप्न – नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुमच्या स्वप्नात सोने- चांदीने भरलेली भांडी आली तर समजून जा की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे. हा धनलाभाचा संकेत मानला जातो.
धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा पाहाणे – नव्या वर्षात जर तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि एखाद्या मंदिरात पूजा चालू असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे. तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)