अंकशास्त्रात (Numerology 14 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (14 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की, नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक- 1
एखाद्या सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. काही लोकांना नवीन जीवनसाथी मिळू शकतो. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. विरोधक वरचढ होऊ शकतात. मुलांच्या करिअरबाबत तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता.
शुभ अंक- 52
शुभ रंग- चंदेरी
- अंक-2
सामाजिक सन्मान मिळू शकेल. व्यावहारिक प्रतिष्ठा उजळेल. जोडप्यांमधला दुरावा कमी होईल. भागीदारी व्यवसाय न केल्यास चांगले होईल. आर्थिक व्यवहारासाठी दिवस चांगला आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्या.
शुभ अंक- 22
शुभ रंग – राखाडी
- अंक-3
आज उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल. सेल्स आणि फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील.प्रवास संभवतो. प्रेमी युगुलांसाठी दिवस थोडा त्रासदायक असेल.
शुभ अंक – 12
शुभ रंग- हिरवा
- अंक- 4 तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. अडचणींना तोंड देण्याची तुमची क्षमता तुम्हाला एक विशेष ओळख देईल. तुमच्या क्षमतेमुळे करियर नवे मार्ग सापडतील.
शुभ अंक – 2
शुभ रंग – पांढरा
- अंक-5
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग काढण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी असतील. स्वप्नांच्या जगात जगण्यापेक्षा खऱ्या जगात राहणे चांगले.
शुभ अंक- 5
शुभ रंग – पिवळा
- अंक- 6
भविष्यातील योजनांचा विचार करा. तुमच्यासाठी चांगला काळ पुढे आहे. कोर्टाच्या फेऱ्या कमी होतील आणि थांबलेले पैसेही मिळतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन भागीदारी किंवा युती होऊ शकते.
शुभ अंक- 3
शुभ रंग- सोनेरी
- अंक- 7
आयात आणि निर्यातीसाठी आजचा दिवस चांगला आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला नको असलेल्या त्रासाला सामोरे जावे लागेल. घाईघाईत धोकादायक पावले उचलू शकता. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
शुभ अंक- 7
शुभ रंग – वायलेट
- अंक- 8
हितशत्रूंपासून धोका संभवतो. विरोधकांवर नजर ठेवून सावधपणे वाटचाल करावी लागेल. वैयक्तिक ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तणाव जाणवू शकतो, परंतु कामावर कोणताही परिणाम होणार नाही.
शुभ अंक- 14
शुभ रंग- लाल
- अंक-9
वैयक्तिक स्वार्थासाठी आवेगाने कोणताही निर्णय घेऊ नका, यामुळे कुटुंबाचे नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक- 12
शुभ रंग- लिंबू
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)