22 मे म्हणजे आज भानु सप्तमीचा व्रत करतात. हा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्य देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक आजच्या दिवशी सूर्य देवाची विधीवत पूजा करतात. यादिवशी तुम्ही काही उपाय ही करू शकतात.
यादिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान झाल्यावर तांब्याच्या एका कलशात पाणी घेऊन. त्यात लाल फुलं, लाल चंदन, आणि साखर टाका. हे पाणी सूर्य देवाला अर्पण करा. या दरम्यान ओम सूर्य देवाय नमो नम: मंत्राचे जप करा. असं केल्याने तुम्ही निरोगी राहता. जीवनातील सर्व त्रासापासून तुमची सुटका होते.
सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठन करा. याने सूर्य देवाचे आशीर्वाद लाभतात. धन, धान्य आणि आरोग्य प्राप्त होते. परशु राम सूर्य देवाची पूजा करताना या स्तोत्राचे पठन करत.
यादिवशी दान करणं खूपच शुभ मानलं जातं. यादिवशी गरिबाला गहू, तांदूळ, गुळ आणि लाल कापड दान करा. याने सूर्या देवाची कृपा लाभते.
भानु सप्तमीच्या दिवशी सूर्य देवाचा मंत्र ओम र्हीं र्हीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा या मंत्राचा जप करा. असं केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात. सर्व मनोकामाना पूर्ण होतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. यासंदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.)