मुंबई : संपूर्ण देशात चैत्र नवरात्री (Navratri 2022) खूप उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. हा दिवस चंद्रघंटा (Chandraghanta) देवीला समर्पित आहे. चंद्रघंटा माता (Mata) पापांचा नाश करते आणि राक्षसांना मारते अशा आस्था आहे . आई हातात तलवार, त्रिशूळ, धनुष्य आणि गदा घेऊन आहे. देवीच्या माथ्यावर चंद्रकोर असल्याने देवीच्या तिसऱ्या रूपाला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते. माता आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते. त्यामुळे माता चंद्रघंटा भक्तांना प्रत्येक परिस्थितीत दुःखापासून मुक्त करते. परंतू देवीची आराधना करताना काही गोष्टीचे लक्ष ठेवणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेवूयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
हिंदू कॅलेंडरनुसार, तृतीया तिथी 4 एप्रिल रोजी दुपारी 1.54 पर्यंत राहील. चैत्र शुक्ल पक्षातील तृतीया तिथी सोमवार, 4 एप्रिल रोजी आहे.
देवी चंद्रघंटाला दुधापासून बनवलेले अन्न अर्पण केले जाते. शास्त्रानुसार मुलींना खीर, खीर आणि स्वादिष्ट मिठाई अर्पण केल्याने आई प्रसन्न होते. गाईच्या दुधाची खीर चंद्रघंटा मातेला प्रसाद म्हणून अर्पण केल्याने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात, असा विश्वास आहे. या देवीला पिवळा रंग आवडत असल्याने आज या रंगाचे कपडे घालणे शुभ ठरते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा करण्यासाठी मातेच्या पदरावर चंद्रघंटाची मूर्ती किंवा चित्र बसवावे. यानंतर देवीच्या चित्राला गंगाजलाने शुद्ध करा. एका भांड्यात कलश भरा आणि त्यावर एक नारळ ठेवा. त्यानंतर पूजेचे व्रत घेऊन मातेसह सर्व देवतांची वैदिक आणि सप्तशती मंत्रांच्या सहाय्याने पूजा करावी.
पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता॥
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!